
Matru Din 2023 Date: हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी असते, जी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. यासोबतच या अमावस्यांना विशेष महत्त्व असते. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात. यावर्षी पिठोरी अमावस्या 14 सप्टेंबर 2023 रोजी साजरी होणार आहे. 'पिठोरी अमावस्या' (Pithori Amavasya) दिवशी मातृदिन (Matru Din) साजरा केला जातो. या अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते.
याशिवाय या दिवशी माँ दुर्गेची पूजा केली जाते. या दिवशी महिला दुर्गा देवीची पूजा करतात आणि आपल्या पुत्रांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. मान्यतेनुसार पिठोरी अमावस्येचे व्रत केल्याने निपुत्रिकांना संतती रत्ने प्राप्त होतात. ज्या माता हे व्रत पाळतात त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. देशात पिठोरी अमावस्येला मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मुलं आपल्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देतात. (हेही वाचा - Eid-e-Milad 2023 Processions: गणपती विसर्जनामुळे 'ईद-ए-मिलाद'च्या मिरवणुका पुढे ढकलल्या; मुंबई, पुणे येथील मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय)
पिठोरी अमावस्येच्या दिवशी दान, तपश्चर्या आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे. स्नानानंतर पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. केवळ विवाहित महिलाच पिठोरी अमावस्येचे व्रत आणि पूजा करू शकतात अशी धार्मिक मान्यता आहे.
भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या अतिशय विशेष मानली जाते. या दिवशी स्नान, दान, श्राद्ध विधींव्यतिरिक्त दुर्गा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. भाद्रपद अमावस्येला हातात कुश घेऊन तर्पण अर्पण केल्याने अनेक पिढ्यांचे पितर तृप्त होतात.