October 2024 Festival List (Photo Credit - File Image)

October 2024 Festival List: ऑक्टोबर महिन्यात अनेक उपवास आणि सण साजरे करण्यात येणार आहेत. हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे सण या महिन्यात येत आहेत. ऑक्टोबरची सुरुवात सर्व पितृ अमावस्या (Sarva Pitru Amavasya 2024) आणि शारदीय नवरात्र (Sharadiya Navratri 2024) व्रताने होईल, तर महिन्याची समाप्ती नरक चतुर्दशी (Naraka Chaturdashi 2024) या सणाने होईल. याच महिन्यात दसरा सणही साजरा केला जाणार आहे. याशिवाय ऑक्टोबरमध्ये पापांकुशा एकादशी (Papankusha Ekadashi 2024) आणि रमा एकादशी (Rama Ekadashi 2024) चे व्रतही पाळले जाणार आहेत. भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी हे व्रत पाळले जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्याने भक्त सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतात.

याशिवाय, ऑक्टोबर महिन्यातच शरद पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात या तिथीला विशेष महत्त्व आहे. तथापी, या महिन्यात करवा चौथ व्रत पाळण्यात येणार आहे. विवाहित महिलांसाठी करवा चौथचे व्रत अतिशय महत्त्वाचे आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या आनंदासाठी निर्जल उपवास करतात. (हेही वाचा - Shardiya Navratri 2024 Colours With Days: 3 ऑक्टोबर पासून सुरू होत शारदीय नवरात्री मध्ये यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग? पहा 10 दिवसांचे रंग)

ऑक्टोबर 2024 मधील सणांची संपूर्ण यादी -

  • 2 ऑक्टोबर 2024, बुधवार- सर्व पितृ अमावस्या, अश्विन अमावस्या, कंकणाकृती सूर्यग्रहण
  • 3 ऑक्टोबर 2024, गुरुवार - नवरात्रीला सुरुवात
  • 10 ऑक्टोबर 2024, गुरुवार - सरस्वती पूजा
  • 11 ऑक्टोबर 2024, शुक्रवार – दुर्गा अष्टमी, महानवमी
  • 12 ऑक्टोबर 2024, शनिवार – विजयादशमी, दसरा
  • 12 ऑक्टोबर 2024, शनिवार - दसरा
  • 13 ऑक्टोबर 2024, रविवार – पापंकुशा एकादशी
  • 16 ऑक्टोबर 2024, बुधवार – कोजागर पूजा, शरद पौर्णिमा
  • 17 ऑक्टोबर 2024, गुरुवार – तूळ संक्रांती, अश्विन पौर्णिमा
  • 20 ऑक्टोबर 2024, रविवार - करवा चौथ
  • 24 ऑक्टोबर 2024, गुरुवार- अहोई अष्टमी
  • 28 ऑक्टोबर 2024, सोमवार - गोवत्स द्वादशी
  • 28 ऑक्टोबर 2024, सोमवार - रमा एकादशी
  • 29 ऑक्टोबर 2024, मंगळवार - धनत्रयोदशी
  • 30 ऑक्टोबर 2024, बुधवार - काली चौदस
  • 31 ऑक्टोबर 2024, गुरुवार – नरक चतुर्दशी

दरम्यान, 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी उत्तम मुहूर्त असतो. दिवाळीच्या दोन दिवस आधी येणाऱ्या या सणात लोक सोन्या-चांदीचे दागिने, भांडी आणि इतर वस्तू खरेदी करतात. तथापी, 31 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जाणार आहे.