Dussehra 2024 Date (फोटो सौजन्य -File Image)

Dussehra 2024 Date: कॅलेंडरनुसार, दसरा (Dussehra 2024) हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. याला विजयादशमी (Vijayadashami 2024) किंवा रावण दहन (Rawan Dahan) असेही म्हणतात. शास्त्रांमध्ये हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्रीरामांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून माता सीतेला त्याच्या तावडीतून मुक्त केले होते.

या दिवशी देशभरात रावणाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. विजयादशमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा केली जाते. तसेच या दिवशी श्री राम, माँ दुर्गा, श्री गणेश आणि हनुमानजींची पूजा केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो. यंदा दसरा कधी साजरा होणार हे जाणून घेऊयात...(हेही वाचा - Lalita Panchami 2024 Date: ललिता पंचमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व)

दसरा कधी आहे?

दशमी तिथीचा प्रारंभ: 12 ऑक्टोबर सकाळी 10.58 वा

समाप्ती तारीख: 13 ऑक्टोबर 2024, सकाळी 09:08 वाजता

12 ऑक्टोबर 2024 रोजी दसरा साजरा होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार विजयादशमीच्या दिवशी श्रवण नक्षत्राची उपस्थिती अत्यंत शुभ असून, यावर्षी हा योगायोग ठरत आहे. श्रवण नक्षत्र 12 ऑक्टोबरला पहाटे 5:25 वाजता सुरू होते आणि 13 ऑक्टोबरला पहाटे 4:27 वाजता संपते.

दसरा पूजेचा शुभ मुहूर्त -

या वर्षी दसरा पूजेचा शुभ मुहूर्त 2:02 पासून सुरू होईल, जो 2:48 पर्यंत चालेल. मुहूर्ताचा एकूण कालावधी अंदाजे 46 मिनिटे असेल.

दसरा महत्व -

दसरा हा श्रीरामाचा रावणावर विजय झाल्याचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. परंतु त्याचे महत्त्व एवढ्यापुरतेचं मर्यादीत नाही. दसऱ्याच्या दिवशी श्री रामाची पूजा केल्याने कामात विजय प्राप्त होतो. यशाचे नवे मार्ग खुले होतात आणि निर्भयतेसारखे गुण रुजवले जातात. त्याचबरोबर या दिवशी रावण दहन पाहिल्याने आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक दोष नष्ट होतात.