Vinayak Chaturthi 2021: वैशाख महिन्यातील विनायक गणेश चतुर्थी दिवशी उपवास केल्यास पूर्ण होतील मनोकामना, जाणून घ्या पूजा विधी
Sankashti Chaturthi June 2020 | (Photo Credits: Pixabay)

Vinayak  Chaturthi 2021: हिंदू पंचागांनुसार, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही सहसा प्रत्येक अमावस्येनंतर येते. तर पौर्णिमेला येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मोठ्या मनोभावाने पूजा केली जाते. पूजा केल्याचे शुभ फळ सुद्धा मिळते असे मानले जाते. अशी मान्यता आहे की, या दिवशी गणपतीची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच गणपीचे आशीर्वाद मिळून त्याच्या सारखे धैर्य आणि ज्ञान प्राप्ती ही मिळते. वैखाश महिन्यातील विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विविधतेने पूजा केल्यानंतर कथा ऐकवणे किंवा ऐकल्यास लाभ मिळतो असे म्हटले जाते.

सनातन धर्मात श्री गणेशाला बळ आणि बुद्धीची देवता मानले जाते. श्रीगणेश सर्व देवांमध्ये प्रथम पूज्य मानले जातात. गणपतीची मोठ्या भक्तीभावाने पूजा केल्यास सर्व विघ्न दूर होतात. त्याचसोबत गणपतीचे आशीर्वाद ही मिळतात. चतुर्थीच्या दिवशी व्रत पूजा केल्यास आयुष्यात सुख, समृद्धी आणि शुभता प्राप्त होते. आयुष्यातील मोठी संकटे सुद्धा टळतात. तसेच नकारात्मकता दूर होते आणि यशाचे मार्ग मोकळे होतात.

>>विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त

-विनायक चतुर्थी: 15 मे (शनिवार) 2021

-चतुर्थी आरंभ: 07.59 वाजता (15 मे) ते

-चतुर्थी समाप्ती: 10.00 वाजता (16 मे)

-पूजेचा शुभ मुहूर्त: सकाळी 10.56 मिनिटांनी ते दुपारी 01.39 मिनिटांपर्यंत

विनायक चतुर्थी दिवशी सुर्योदयापूर्वी स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करुन गणपतीसाठी उपवास ठेवत व्रताला सुरुवात करा. या व्रतावेळी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला. पूजेच्या मंदिराची स्वच्छता करात. मंदिराची स्थापना अशा दिशेला हवी की, पूजा करताना तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल. पूजा सुरु केल्यानंतर गणपतीच्या फोटोला किंवा मुर्तीला गंगाजलसह स्नान घालत धूप किंवा शुद्ध तूपाचा दीवा प्रज्वलीत करा. तर संध्याकाळी सुद्धा श्रीगणेशाची पूजा किंवा आरती करा. त्यानंतर चंद्रोदयाच्या वेळी चंद्राचे दर्शन करत त्याला अर्घ्य दिल्यानंतर ब्राम्हणांना दान-दक्षिणा द्या. त्यानंतर उपवास सोडा.