Vinayak Chaturthi 2020 Muhurt: विनायक चतुर्थी निमित्त विघ्नहर्त्या गणेशाची अशा पद्धतीने करा आराधना, जाणून घ्या शुभ मुहूर्त
पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) असे म्हटले जाते. विनायक चतुर्थीचे व्रत प्रत्येक महिन्यात करावे लागते. सध्या संपूर्ण देशावर कोरोना व्हायरस सारख्या महाभयाण विषाणूचे आलेले संकट दूर करण्यासाठी आज विनायकाच्या प्रिय भक्तांनी मनापासून या गणेशाची पूजा करावी.
Vinayak Chaturthi 2020: आपल्या भक्तांवरील आलेले विघ्न दूर करणारा विघ्नहर्त्या गणेशाची मनोभावे पूजाअर्चा करण्यासाठी विनायक चतुर्थी हा दिवस शुभ मानला जातो. अमावस्या नंतर येणाऱ्या शुल्क पक्ष चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) म्हणतात. त्याचसोबत पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) असे म्हटले जाते. विनायक चतुर्थीचे व्रत प्रत्येक महिन्यात करावे लागते. सध्या संपूर्ण देशावर कोरोना व्हायरस सारख्या महाभयाण विषाणूचे आलेले संकट दूर करण्यासाठी आज विनायकाच्या प्रिय भक्तांनी मनापासून या गणेशाची पूजा करावी.
गणेश चतुर्थी प्रमाणे विनायक चतुर्थीलाही विशेष महत्व आहे. या दिवशी गणेशभक्त आपल्या आयुष्यात भरपूर सुख-समृद्धी प्राप्त होण्यासाठी आपल्या लाडक्या गणेशाची मनोभावे पूजा करतात.
पाहा विनायक चतुर्थीचा मुहूर्त:
या संकट हर्त्या गणेशाची पूजा करण्यासाठी आज दुपारी 12 वाजून 1 मिनिट ते 12 वाजून 51 मिनिटांपर्यंत असेल. Vinayak Chaturthi 2019: विघ्नहर्ता गणेशाची पूजाअर्चा करण्यासाठी शुभ मानला जातो विनायकी चतुर्थीचा दिवस; जाणून घ्या या दिवसाचे महत्व
विनायक चतुर्थी चा पूजाविधी:
या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर धूतवस्त्र नेसावे. घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हार्यासमोर एक स्वच्छ केलेला पाट ठेवावा त्यावर पिंजरीने एक आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर सोन्याचांदीची अगर तांब्यापितळेची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेऊन पूजा करावी आणि संध्याकाळी उदबत्ती ओवाळून विनायकावर पाणी शिंपडावे व पुनरागमनायच असे म्हणून मूर्ती अगर पूजेला लावलेली सुपारी हलवावी अशा रीतीने, श्रद्धेने विनायकी चतुर्थी व्रत पूजन करून पोथी वाचावे अथवा नामस्तोत्र म्हणावे. पूजेनंतर गणपतीच्या आरत्या म्हणाव्या.
श्री गणेशाची पूजा करताना आणि दुर्वा वाहताना 'ॐ गणपतेय नम:' या मंत्राचा जाप करावा. गणपतीला मोदकांचा नैवेद्य, जास्वंद आणि दुर्वा अर्पण कराव्यात. या दिवशी कोणाबद्दल ही वाईट विचार करु नये. विनायक चतुर्थीला सौभाग्यवती महिलांनी उपवास ठेवावा. चतुर्थीला गणपतीची मनोभावे पूजा करुन तुमच्या मनातील इच्छा त्याच्या समोर व्यक्त केल्यास त्या पूर्ण होतात अशी लोकांची श्रद्धा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2020 09:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

