Vinayak Chaturthi 2019: विघ्नहर्ता गणेशाची पूजाअर्चा करण्यासाठी शुभ मानला जातो विनायकी चतुर्थीचा दिवस; जाणून घ्या या दिवसाचे महत्व
Ganpati idol (Photo Credits: Pixabay)

Vinayaka Chaturthi Importance: हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक चंद्रोदयाच्यावेळी चर्तुर्थी येते. त्यामुळे हिंदू धर्मग्रथांनुसार चतुर्थी तिथीला श्रीगणेशाची पूजा केली जाते. अमावस्या नंतर येणाऱ्या शुल्क पक्ष चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) म्हणतात. तर पौर्णिमेनंतर येणा-या कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. 30 नोव्हेंबरला असणा-या विनायकी चतुर्थीला गणेशाची पूजाअर्चा केल्यास आयुष्यात भरपूर सुख-समृद्धी प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे.

या दिवशी मनोभावे गणेशाची पूजा केल्यास तुमच्या आयुष्यात काही विघ्न आले असतील, अडी-अडचण आली असेल तर त्या दूर होतात.

हेदेखील वाचा- Angarki Special Modak Recipes: अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मोदक पीठाऐवजी थेट तांदूळ, रवा वापरून कशी बनवाल लुसलुशीत उकड (Watch Video)

पूजा करताना लक्षात ठेवा या गोष्टी:

1) गणेशाची पूजा करताना गणेशस्तोत्र किंवा पठण करावे.

2) गणपतीला मोदकांचा नैवेद्य, जास्वंद आणि दुर्वा अर्पण कराव्यात.

3) या दिवशी कोणाबद्दल ही वाईट विचार करु नये.

4) विनायक चतुर्थीला सौभाग्यवती महिलांनी उपवास ठेवावा.

5) चतुर्थीला गणपतीची मनोकामे पूजा करुन तुमच्या मनातील इच्छा त्याच्या समोर व्यक्त केल्यास त्या पूर्ण होतात.

या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर धूतवस्त्र नेसावे. घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हार्‍यासमोर एक स्वच्छ केलेला पाट ठेवावा त्यावर पिंजरीने एक आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर सोन्याचांदीची अगर तांब्यापितळेची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेऊन पूजा करावी आणि संध्याकाळी उदबत्ती ओवाळून विनायकावर पाणी शिंपडावे व पुनरागमनायच असे म्हणून मूर्ती अगर पूजेला लावलेली सुपारी हलवावी अशा रीतीने, श्रद्धेने विनायकी चतुर्थी व्रत पूजन करून पोथी वाचावे अथवा नामस्तोत्र म्हणावे. पूजेनंतर गणपतीच्या आरत्या म्हणाव्या.