Shiv Jayanti 2026 Wishes In Marathi: सर्वोत्तम WhatsApp Status, Quotes आणि Messages; स्वराज्याच्या निर्मात्याला मानाचा मुजरा
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती २०२६ मध्ये दोनवेळा साजरी केली जाणार आहे. तारखेनुसार १९ फेब्रुवारी तर तिथीनुसार ६ मार्च रोजी शिवजन्मोत्सवाचा सोहळा रंगणार असून त्यानिमित्त खास शुभेच्छा संदेश आणि माहिती येथे उपलब्ध आहे.
मुंबई: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. २०२६ मध्ये देखील शिवभक्तांना दोनदा शिवजयंती साजरी करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार अधिकृत शिवजयंती गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी होईल. तर, हिंदू पंचांगाप्रमाणे तिथीनुसार हा सोहळा शुक्रवार, ६ मार्च २०२६ रोजी संपन्न होणार आहे.
तारखेनुसार आणि तिथीनुसार शिवजयंती
महाराष्ट्र सरकारने १९ फेब्रुवारी १६३० ही शिवरायांची अधिकृत जन्म तारीख स्वीकारली आहे. त्यामुळे दरवर्षी १९ फेब्रुवारीला राज्यभर सार्वजनिक सुट्टी असते आणि शिवनेरी किल्ल्यासह ठिकठिकाणी सरकारी सोहळे पार पडतात.
दुसरीकडे, अनेक शिवप्रेमी हिंदू पंचांगातील 'फाल्गुन वद्य तृतीया' या तिथीनुसार जयंती साजरी करण्यास प्राधान्य देतात. २०२६ मध्ये ही तिथी ६ मार्च रोजी येत आहे. पंचांगानुसार, तृतीया तिथी ५ मार्च रोजी संध्याकाळी सुरू होऊन ६ मार्चच्या संध्याकाळपर्यंत असेल.
शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी
सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून घुमणारा एकच आवाज...
ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले, त्या युगपुरुषाला मानाचा मुजरा.
शिवजयंती च्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा."

निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू.
अखंड लक्ष्मी अलंकृत, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज.
शिवजन्मोत्सवाच्या भगव्या शुभेच्छा.
शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा इन मराठी

अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे...
या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा 'शिवबा' पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

तलवारीच्या पात्याने आणि रक्ताच्या थेंबाने ज्यांनी इतिहास लिहिला,
अशा रयतेच्या राजाचा विजय असो.
१९ फेब्रुवारी - अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा.

ऐतिहासिक महत्त्व आणि परंपरा
शिवजयंती साजरी करण्याची परंपरा १८७० मध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून पुण्यात सुरू केली होती. पुढे लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. आज हा सण केवळ उत्सव न राहता महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक बनला आहे. किल्ले शिवनेरीवर होणारा जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो शिवभक्त गर्दी करतात.
(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2026 08:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

