Angarki Special Modak Recipes: अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मोदक पीठाऐवजी थेट तांदूळ, रवा वापरून कशी बनवाल लुसलुशीत उकड (Watch Video)
Modak (Photo Credits: File Photo)

Angarki Sankashti Chaturthi 2019: आजची अंगारकी चतुर्थी ही 2019 मधील पहिली आणि शेवटची अंगारकी चतुर्थी आहे. भाद्रपद कृष्ण पक्षातील चतुर्थीला येणारी अंगारकी ही वर्षातून दोनदा तर कधी कधी तीनदा येते. मात्र यंदा ही अंगारकी या वर्षातील पहिली आणि शेवटची अंगारकी आहे. त्यामुळे आज सर्व गणेश भक्त या अंगारकी निमित्त विशेष उत्साही असतील. तसेच अंगारकी निमित्त अनेकांचे उपवासही असतील. त्यासाठी संध्याकाळी 8.48 मिनिटांनी चंद्रोदयानंतर गणेशाची पूजा-अर्चा करून उपवास सोडला जाईल. यासाठी आज प्रत्येक महिला, गृहिणी गणपती बाप्पांना प्रिय असलेले उकडीचे मोदक (Modak) नैवेद्य म्हणून दाखविण्यासाठी विशेष तयारी करतील.

गृहिणींना उकडीचे मोदक करताना अनेक उपदव्याप करावे लागतात. मोदकाचे पीठ, मोदकातील सारण या सर्व गोष्टी बारकाईने कराव्या लागतात. म्हणून हा त्रास कमी करता यावा म्हणून तुमच्या कामी येतील या रव्यापासून तसेच तांदळापासून बनवलेल्या झटपट मोदक रेसिपीज

तांदळापासून बनवलेले मोदक:

हेही वाचा- Happy Angarki Chaturthi 2019 Wishes: अंगारकी चतुर्थीच्या मराठमोळ्या शुभेच्छा SMS, WhatsApp Status,च्या माध्यमातून गणेशभक्तांसोबत शेअर करून बनवा साऱ्यांचा दिवस खास

रव्यापासून बनवलेले मोदक:

हेही वाचा- Angarki Chaturthi 2019: अंगारकी चतुर्थी गणेशभक्तांसाठी का असते खास; जाणून घ्या चंद्रोदय वेळ आणि पूजा विधी

यादिवशी सूर्योदयाच्या आधी उठून आंघोळ उरकून स्वच्छ नवे कपडे परिधान करावे. श्रीगणेशाची प्रतिमा घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थापन करून पूजेचा संकल्प घ्यावा. अनुक्रमे या प्रतिमेला पाणी, अक्षदा, दुर्वा,पान, धूप इत्यादी अर्पण करावे. नैवैद्याला मोदक किंवा अन्य गोडाचे पदार्थ ठेवावे. पूजेच्या वेळेस म्हणजे चंद्रोदयानंतर गणपतीची आरती करून भोजन करावे. शक्यतो या जेवणात लसूण व कांद्याचा समावेश करणे टाळावे.