Happy Angarki Chaturthi 2019 Wishes: अंगारकी चतुर्थीच्या मराठमोळ्या शुभेच्छा SMS, WhatsApp Status,च्या  माध्यमातून गणेशभक्तांसोबत शेअर करून बनवा साऱ्यांचा दिवस खास
Angarki Chaturthi 2019 Wishes (Photo Credits: File Image)

Angarki Sankashti Chaturthi 2019 Wishes: काही दिवसांपूर्वीच देशभरात जल्लोषात गणेशोत्सव (Ganeshotsav) पार पडला, बाप्पाने आपल्यातुन रजा घेतल्यावर अनेक गणेशभक्तांची निराशा झाली. मात्र यंदा गणेशोत्सवानंतर लगेचच अंगारकी चतुर्थीचा (Angarki Chaturthi)  योग जुळून आल्याने पुन्हा एकदा बाप्पाच्या भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.  17 सप्टेंबर म्हणजेच मंगळवारी अंगारकी चतुर्थी आहे. दरवर्षी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातून दोनदा मंगळवार आणि चतुर्थीचा योग येत असल्याने  दोनदा अंगारकी साजरी होते , मात्र यावेळेस 17 सप्टेंबरची अंगारकी ही वर्षातील पहिली आणि शेवटची असणार आहे. या खास दिवशी तुमच्या कुटुंबातील, मित्र परिवारातील, बाप्पाच्या भक्तांना शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आणखीनच खास करण्यासाठी ही काही मराठमोळी शुभेच्छा पत्रे नक्की कामी येतील. ही शुभेच्छापत्रे तुम्ही तुमच्या सोशल मीडिया व SMS, WhatsApp Status, च्या माध्यमातून शेअर करू शकता..

 

श्री गणेशाच्या कृपेने, प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक कार्यात आपल्याला यश लाभो ही सदिच्छा

अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Angarki Chaturthi 2019 Wishes (Photo Credits: File Image)

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

अंगारकी चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Angarki Chaturthi 2019 Wishes (Photo Credits: File Image)

गणराय मजपुढे मी पाहिला

तव कर स्पर्श प्रसाद लाभों मजला

यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला

अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा

Angarki Chaturthi 2019 Wishes (Photo Credits: File Image)

ॐ एकदंताय विद्महे

वक्रतुंडाय धीमहि ।

तन्नो दन्ती प्रचोदयात्

अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Angarki Chaturthi 2019 Wishes (Photo Credits: File Image)

(Angarki Chaturthi 2019: अंगारकी चतुर्थी गणेशभक्तांसाठी का असते खास; जाणून घ्या चंद्रोदय वेळ आणि पूजा विधी)

माता पित्याचे आत्मरूप तू

ओंकाराचे पूर्ण रूप तू

कार्यारंभी तुझी अर्चना

विनायका स्वीकार वंदना

अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Angarki Chaturthi 2019 Wishes (Photo Credits: File Image)

दरवर्षी यानिमित्ताने मुंबईतील सिद्धिविनायक सह अनेक स्थानिक गणेश मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगा लागतात. उपवास करून, गणेशाची आराधना करत हा दिवस साजरा केला जातो.