वटपौर्णिमा (Vat Purnima) हा सण महाराष्ट्रात सौभाग्यवती महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत यासाठी व्रताला सुरूवात केली जाते. दरम्यान ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमेचा दिवस असतो. यंदा 21 जून दिवशी ही वटपौर्णिमा महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाणार आहे. मग या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या साथीदाराला देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल. पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी खास व्रत ठेवून प्रार्थना करतात. मग अशा या खास दिवसाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Images, Wishes, Greetings द्वारा देत वटपौर्णिमेच्या दिवशी प्रेमाचा बंध नक्की अधिक दृढ करू शकाल.
वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या व्रतामुळे महिलांना पतीच्या दीर्घायुष्यासह सुखी वैवाहिक जीवन लाभते. अशी धारणा आहे. Vat Purnima 2024 Ukhane: वट पौर्णिमा सणाला नववधूंनो, 'या' खास उखाणांनी पुरवा तुमच्या मैत्रिणींचा, ज्येष्ठांचा हट्ट!
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
वट सावित्री पौर्णिमेच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटवृक्षाचे वय शेकडो वर्षे असते. आपल्या पतीलाही वटवृक्षाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावे आणि आपल्या कुटुंबाचा आनंद वटवृक्षासारखा हिरवागार ठेवायचा असल्याने त्या हे व्रत पाळतात. त्याच वेळी, दुसर्या कथेनुसार, सावित्रीने वटखाली बसून तपश्चर्या करून पतीचे प्राण वाचवले होते, म्हणून वट सावित्री पौर्णिमेच्या व्रताला वटवृक्षाची (वटवृक्षाचे आरोग्य फायदे) पूजा केली जाते. त्याचबरोबर वटवृक्षाचे स्वतःचे धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व आहे. हिंदू मान्यतेनुसार, शिव, ब्रह्मा आणि विष्णू वडामध्ये राहतात. हे झाड दीर्घकाळ हिरवे राहते आणि पर्यावरण संतुलनात विशेष योगदान देते. त्यामुळे या विशेष दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते.