Vat Purnima 2024 Ukhane: वट पौर्णिमा सणाला नववधूंनो, 'या' खास उखाणांनी पुरवा तुमच्या मैत्रिणींचा, ज्येष्ठांचा हट्ट!
Vat Pournima

वटपौर्णिमेचा सण महाराष्ट्रात सवाष्ण महिलांसाठी महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. हिंदू मान्यतांनुसार, सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या केलेले व्रत म्हणजे हे वट सावित्रीचं व्रत त्यामुळे सातही जन्म हाच पती मिळावा या धारणेसह त्याच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थनेसह वट पौर्णिमा साजरी केली जाते. नवविवाहितांसाठी हा वटपौर्णिमेचा सण देखील खास असतो. पहिलीच वटपौर्णिमा असणार्‍यांमध्ये या सणाच्या निमित्ताने खास तयारी केली जते. दरम्यान या व्रताच्या पुजेनंतर अनेकींना उखाणा घेण्याचा हट्ट केला जातो. वडिलधार्‍यांकडून, मैत्रिणींकडून हा गोड हट्ट पूर्ण करण्यासाठी हे वट पौर्णिमा विशेष खास उखाणे नक्की जाणून घ्या!

ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस हा वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्रात वट पौर्णिमा 21 जून दिवशी साजरी केली जाणार आहे. रीती नुसार सवाष्ण महिला या दिवशी वटसावित्रीचं व्रत ठेवतात. वडाच्या झाडाला 7 फेर्‍या मारून दोरा गुंडाळतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. Vat Purnima 2024 Messages in Marathi: वट पौर्णिमा निमित्त WhatsApp Status, Quotes, Greetings शेअर करत वट सावित्री व्रताच्या द्या शुभेच्छा.

वटपौर्णिमा विशेष  उखाणे

1. आयुष्यात सुख-दु:ख दोन्ही असावे

--- राव पती म्हणून सातही जन्म सोबत असावे

2. गुलाबापेक्षा नाजूक दिसते शेवंती

-- ला दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वराला विनंती

3. भरजरी साडीला जरतारी खण

--- चं नाव घेते आज वटपौर्णिमेचा सण

4. कोल्हापूरच्या देवीचा सोन्याचा साज

--- चं नाव घेते वटपौर्णिमेचा सण आज

5. तीन वर्षांतून एकदा येतो अधिकमास

--- साठी आज केला वटपौर्णिमेचा उपवास

वडाचं झाडं 24 तास प्राणवायू देतं. त्यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या देखील वडाचं झाड आरोग्यदायी आहे. आयुर्वेदामध्येही त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे नमुद करण्यात आले आहेत.