
Vasubaras 2024 HD Images In Marathi: दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा (Diwali 2024) सण साजरा केला जातो. एकूण 6 दिवसांच्या या उत्सवामध्ये सहाही दिवशी वेगवेगळे सण- वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज, साजरे केले जातात. यंदा 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये दिवाळी साजरी होत आहे. वसुबारस (Vasubaras 2024) या सणाने दिवाळीची सुरुवात होते. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारस साजरी करण्यात येते. यावर्षी आज, 28 ऑक्टोबरला वसुबारस आहे. वसुबारसला घरातील गोधनाची पूजा करण्याची प्रथा आहे. आज शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाई उपलब्ध नसतात, अशावेळेस गाय वासराच्या मूर्तीची देखील पूजा करतात. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.
पंचांगानुसार यावर्षी द्वादशीची तिथी 28 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.37 ते 29 ऑक्टोबर संध्याकाळी 5.04 पर्यंत असणार आहे. त्यामुळे आज 28 ऑक्टोबर रोजी सोमवारी वसुबारस साजरी होईल. या दिवशी घरात देवी लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी गाई आणि वासरूची पूजा केली जाते. यावेळी घरातील बायका गाईच्या पायावर पाणी घालू तिची पूजा करतात व तिला पुरणाचा नैवद्य खायला दिला जातो.
तर अशा या वसुबारसनिमित्त Wishes, HD Images, Wallpapers, Greetings, Messages च्या माध्यमातून द्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.





दरम्यान, वसुबारस हा गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस दिवस आहे. भारतीय संस्कृतीत गो-मातेला फार महत्त्व आहे व म्हणूनच वसुबारसदिवशी घरातील स्त्रिया उपवास करतात. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. तसेच दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थही खात नाहीत. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.