
दिवाळी सणाची खरी सुरुवात होते ती वसुबारसने (Vasu Baras 2022), असे मानले जाते. वसुबारसला गोवत्स द्वादशी (Govatsa Dwadashi) असेही म्हटले जाते. वसुबारस (Vasu Baras) आणि गाय यांचे घनिष्ठ नाते आहे. जे पूर्वंपार चालत आले आहे. भारतीय संस्कृतीत गायीला एक उपयुक्त आणि पवित्र पशू अथवा प्राणी मानले जाते. त्यामुळे सहाजिकच दिवळी सणाच्या सुरुवातीला वसुबारस (Vasu Baras 2022 HD Images) मोठ्या प्रमाणावर साजरी होते. वसुबारस निमित्त एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जात. त्यामुळे आपणही आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या माध्यमातून Whatsapp, Facebook, Instagram आणि ट्विटर अशा मंचावरुन एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी आम्ही येथे काही HD Images, Greetings देत आहोत. जे आपम एकमेकांना शुभेच्छा देताना नक्की वापरु शकता.
वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी हिंदू पंचागांनुसार अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरी केला जाते. साधारण दिवाळी त्याच दिवासापासून सुरु होते. गोवत्स द्वादशीचा पवित्र दिवस भारतीय राज्यांमध्ये विविध नावांनी साजरा केला जातो. महाराष्ट्रात, लोक हा दिवस वसु बारस म्हणून साजरा करतात. दिवाळीचा पहिला सण म्हणून त्याला विशेष मान्यता असते. गुजरात राज्यात हा सण वाघ बारस किंवा बच बारस म्हणून तर, आंध्र प्रदेशमध्ये श्रीपाद श्री वल्लभ यांचा श्रीपाद वल्लभ आराधना उत्सव म्हणून साजरा करतो.

Vasu Baras | File Image

हिंदू पंचागांनुसार यंदा गोवत्स द्वादशी शुक्रवारी (21 ऑक्टोबर 2022) रोजी आहे. वसुबारस सणाच्या दिवशी उपवासही केला जातो. उपवास करणारे भक्त गहू आणि दुधाचे पदार्थ खाणे टाळतात. कुटुंबातील महिला आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास ठेवतात. तसेच, घरातील धन्याला बरकत यावी यासाठी देवाकडे मागणे मागतात. वसुबारसेनिमीत्त लोक गायींना कपडे आणि दागिन्यांनी सजवतात. त्यांच्या कपाळावर सिंदूर लावतात.


वसुबारस आणि गाईची पूजा
घरातील सवाष्ण महिलेने गायीच्या पयांवर पाणी वाहावे. त्याच महिलेने गाईच्या कपाळाला हळदी-कूंकू लावावे. गाईच्या गळ्यात फुलांचा हार घालून, सुटी फुले गायीच्या मस्तकी वाहावीत. निरंजन असलेल्या तबकाने गाईला (ताट) ओवळावे. केळीच्या पानावर गाईला पुरण पोळीचा नैवेद्य द्यावा. गाईचे मनोभावे दर्शन घ्यावे आणि घरात सुख, समृद्धी, संपत्ती आणि आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करावी.