माघ महिन्यामध्ये गणेश जयंती (Ganesh Jayanti) पाठोपाठ येणारा हिंदू धर्मियांसाठी अजून एक खास दिवस म्हणजे वसंत पंचमी होय. बसंत पंचमी किंवा वसंत पंचमी (Vasant Panchami) या दिवशी ज्ञानदेवता माता सरस्वतीचा जन्मदिन असतो अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे. या दिवशीसरस्वतीपूजन करण्याची प्रथा आहे. दरम्यान महाराष्ट्रात वसंत पंचमीला पंढरपूरामध्ये विठ्ठल -रूक्मिणीचा शाही विवाह सोहळा दरवर्षी पार पडतो. तुमच्या नातेवाईकांना, मित्र मंडळींना या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप स्टेटस, मेसेजेस, फेसबूक मेसेजेस, Wishes, Messages, Stickers च्या माध्यमातून शुभेच्छा देत साजरा करा वसंत पंचमीचा खास दिवस! मान्यतांनुसार, वसंत पंचमीच्या दिवशी लाल कपडे टाळले जातात. या दिवशी पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करून वसंत पंचमीचा आनंद द्विगुणित केला जातो. माता सरस्वती ही विद्या आणि बुद्धीची देवता आहे. हिंदू पुराण कथांनुसार, भगवान श्री कृष्णांनी प्रसन्न होऊन माघ शुक्ल पंचमीला तुझी पूजा,आराधना केली जाईल असा आशिर्वाद दिला होता. भारतात वसंत पंचमीचा सण वसंत ऋतूमध्ये येतो. देवी सरस्वतीचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी झाला असे मानले जाते. यंदा वसंत पंचमी ५ फेब्रुवारीला आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, वसंत पंचमी दरवर्षी माघ महिन्यातील पंचमी तिथी किंवा शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. 'बसंत' किंवा 'वसंत' याचा इंग्रजी अनुवाद स्प्रिंग असा होतो.
वसंत पंचमी 2022: तारीख
वसंत पंचमी 5 फेब्रुवारी रविवार रोजी आहे
वसंत पंचमी 2022: तिथी
यंदाची वसंत पंचमी तिथी ५ फेब्रुवारीला पहाटे ३:४७ वाजता सुरू होईल आणि ६ फेब्रुवारीला पहाटे ३:४६ वाजता संपेल.
वसंत पंचमी 2022: पूजेसाठी शुभ मुहूर्त
वसंत पंचमीच्या पूजेची वेळ यावर्षी सकाळी 07:07 ते दुपारी 12:35 दरम्यान आहे.
वसंत पंचमी 2022: महत्त्व
देवी सरस्वतीची दरवर्षी वसंत पंचमीला पूजा केली जाते कारण ती बुद्धीची देवीता आहे, जी केवळ संगीत आणि कले बरोबर ज्ञानाचे देखील प्रतिनिधित्व करते. वसंत पंचमीला, पंडालमध्ये देवी सरस्वतीची मूर्ती स्थापित केली जाते आणि भक्त तिची प्रार्थना करण्यासाठी 'सरस्वती पूजा' करतात. ती बुद्धीची देवी असल्याने, बरेच लोक या दिवशी त्यांच्या मुलांचे अक्षरअभ्यसम किंवा विद्या आरंभम करतात. वसंत पंचमीच्या दिवशी पिवळा रंग परिधान करतात कारण पिवळा रंग सामान्यतः ऊर्जा आणि ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो.