Utpanna Ekadashi 2019: उत्पत्ति एकादशी निमित्त जाणून घ्या व्रत, कथा, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त
Lord Vishnu (Photo Credit - Facebook)

Utpanna Ekadashi 2019: हिंदू धर्मात एकादशी व्रताचे मोठे महत्व आहे. प्रत्येक वर्षांत 24 एकादशी येतात. यातील सर्वात प्रथम एकादशी ही कार्तिक कृष्ण एकादशी समजली जाते. या दिवशी एकादशी प्रकट झाली होती म्हणून ही एकादशी 'उत्पत्ति एकादशी' (Utpanna Ekadashi 2019) या नावाने ओळखली जाते. कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ति एकादशीचे व्रत केले जाते. या वर्षी म्हणजे 2019 ला 'उत्पत्ति एकादशी'चे व्रत 22 नोव्हेंबर रोजी म्हणजेच येत्या शुक्रवारी आहे. प्रत्येक महिन्यात 'शुक्ल' व 'कृष्ण पक्ष' मिळून दोन एकादशी येतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. परंतु, अनेक लोकांना हे माहित नाही. 'एकादशी' ही एक देवी असून तिचा जन्म हा भगवान विष्णूमुळे झाला होता. ही एकादशी कार्तिक कृष्ण एकादशी या दिवशी प्रकट झाली होती. त्यामुळे तिचे नाव 'उत्पत्ति एकादशी' असे पडले. या दिवसापासून एकादशीचे व्रत ठेवण्यात येते.

उत्पत्ति एकादशी शुभ मुहूर्त -

22 नोव्हेंबर 2019 वार- शुक्रवार

एकादशी तिथि प्रारंभः सकाळी 09.01 मिनिटांपासून

एकादशी तिथि समाप्तः सध्याकाळी: 06.24 मिनटांपर्यंत

हेही वाचा - Sankashti Chaturthi 2019: संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या गणपती बाप्पाच्या 'या' खास आवडत्या गोष्टी

एकादशींत स्मार्त व भागवत असे दोन भेद आहेत. या स्मार्त व भागवत अशा प्रकारच्या एकादशा नेहमीं येत नाहींत. त्यांच्यांतील ठोकळ भेद म्हणजे असा कीं, ज्या वेळीं दोन एकादशा येतील त्या वेळीं स्मार्त पूर्व दिवशीं व भागवत एकादशी दुसर्‍या दिवशीं येते. भागवत एकादशी नेहमीं द्वादशीविद्ध असते. स्मार्त व भागवत या एकादशी केव्हा मानावयाच्या यासंबंधी अधिक माहिती धर्मग्रंथांत सविस्तर दिली आहे.

उत्पत्ति एकादशी व्रत -

उत्पत्ती एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थ स्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते.

उत्पत्ति एकादशीची कथा -

असे म्हटले जाते की, सतयुगात चंद्रावती नगरीत ब्रह्मवंशज नाडी जंग राज्य करीत होता. त्याला मूर नावाचा एक पुत्र होता. मूर हा एक अतिशय बलवान असा दैत्य होता. त्याने आपल्या पराक्रमाने सर्व देवतांना त्रस्त केले होते. इंद्र व इतर देवतांचा पराभव करून त्याने आपले साम्राज्य स्थापित केले होते. कोणत्याही देवतांचा त्याच्या पराक्रमासमोर निभाव लागत नव्हता. त्यानंतर देवतांनी भगवान विष्णुंकडे जाऊन मूर दैत्यांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर भगवान विष्णुंनी मूरवर आक्रमण केले. हे युद्ध हजारो वर्ष चालले. या दरम्यान शेकडो दैत्य मारले गेल्यावर विष्णू यांना झोप येऊ लागली. ते सिंहावती गुहेत जाऊन झोपी गेले. त्यांना मारण्याच्या उद्देशाने मूर पुन्हा त्या गुहेत गेला. त्यानंतर विष्णूंना झोपलेले पाहून त्त्यांच्यावर वार करण्यासाठी जसे मूरने शस्त्र उचलले तसे भगवान विष्णुंच्या शरीरातून एक सुंदर कन्या प्रकट झाली. त्यानंतर दैत्य व कन्या यांच्यात बराच काळ युद्ध होत राहिले.

हेही वाचा - Sankashti Chaturthi 2019: संकष्टी चतुर्थीनिमित्त 'अशी' करा पूजा, जाणून घ्या श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे उपाय

दरम्यान त्या कन्येने दैत्यास धक्का मारून मूर्च्छित केले व त्याचा शिरच्छेद केला. त्यामुळे दैत्य मृत्यू पावला. जेव्हा विष्णू झोपेतून उठले तेव्हा त्यांनी पाहिले की, दैत्य मरण पावला आहे.

त्यानंतर भगवान विष्णुंना यावर प्रश्न पडला. यावर या कन्येने दैत्याच्या वधाचा खुलासा केला. तेव्हा भगवान विष्णुंनी तिचे नाव 'एकादशी', असे ठेवले. कारण, एकादशीलाच्या दिवशी ही कन्या विष्णुंच्या शरीरातून प्रकट झाली होती. त्यामुळेच या दिवसाला 'उत्पत्ति एकादशी', असे म्हटले जाते. त्यामुळे विष्णुंनी एकादशीला असा वर दिला की, प्रत्येक महिन्याच्या एकादशीला जो कोणी उपास करेल त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला विष्णुलोकात स्थान मिळेल.