Tripurari Purnima 2020 Wishes: 'त्रिपुरारी पौर्णिमा', 'देव दिवाळी' आणि 'कार्तिक पौर्णिमे'च्या निमित्ताने खास Mesages Greetings, SMS, Images, WhatsApp Status, HD Images शेअर करून द्या या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा
Tripurari Purnima 2020 (File Image)

एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते व कार्तिक पौर्णिमेला (Kartik Purnima) विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो. याच दिवशी खऱ्या अर्थाने दिवाळी सणाची सांगता होते. कार्तिक पौर्णिमेलाचा साधारणतः त्रिपुरारी पौर्णिमा (Tripuri Purnima) किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या असुराचा वध केला होता, म्हणूनच हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. अनेक ठिकाणी याला ‘देव दिवाळी’ (Dev Diwali) म्हणूनही संबोधले जाते.

अशी मान्यता आहे की, या दिवशी कृतिका नक्षत्रात शंकराचे दर्शन घेतल्यास व्यक्ती सात जन्म ज्ञानी आणि धनवान होते. या दिवशी रात्री शंकराची 1008 नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते, या पूजेचे विशेष महत्त्व आहे. तर अशा शुभदिनी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून साजरी करा ही पौर्णिमा. (हेही वाचा: Wedding season begins: डिसेंबर महिन्यातील लग्नासाठीचे 'हे' आहेत शुभ दिवस)

सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली

शब्दांचीही सुमने फुलती, येता घरोघरी देव दीपावली

देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Kartik Purnima 2020

शंकरपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा देव दिवाळीला,

उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,

वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,

देव दिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!

Kartik Purnima 2020

स्नेहाचा सुगंध दरवळला, देव दिवाळीचा सण आला

एकच मागणे या कार्तिक पौर्णिमेला, सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना

देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Kartik Purnima 2020

तिमिरातून तेजाकडे नेणारा हा सण

दाखवतो प्रकाशाची वाट, उगवते कर्तृत्वाची पहाट

नवी उमेद काजळी पुसण्याची, नात्यांचे रेशीम बंध घट्ट करण्याची

प्रकाशाचा हा उत्सव, आपले आयुष्य उजळून टाको

त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Kartik Purnima 2020

नव्या सणाला उजळू दे आकाश

सर्वत्र पसरू दे लख्ख प्रकाश, जुळावे नवे प्रेमबंध हा एकच ध्यास

आला आज कार्तिक पौर्णिमेचा सण खास

देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Kartik Purnima 2020

दरम्यान, काही पौराणिक कथांनुसार, श्रीविष्णूंनी यात दिवशी प्रथम अवतार धारण केला होता, असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. अशा प्रकारे हा पवित्र दिवस गंगा स्नान, दीपदान, होम, यज्ञ आणि उपासना करून साजरा करण्याबाबत शास्त्रात नमूद केले आहे. वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो.