दरवर्षी १९ ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिन (World Photography Day 2019) म्हणून साजरा केला जातो. छायाचित्राचा आधार घेत आपल्या भावना लोकांसमोर मांडण्याचे काम एक छायाचित्रकार करीत असतो. छायाचित्रकाराच्या कामाला प्रोत्साहीत करण्यासाठी दरवर्षी जागतिक छायाचित्र दिन साजरा केला जातो. परंतु हा दिन साजरा करण्यामागे कोणते कारण आहे ? याबदल खूप कमी लोकांना माहिती आहे. तर जाणून घेवूया जागतिक छायाचित्र दिनाचा इतिहास, आणि साजरा करण्यामागचे मुख्य कारण...
पहिले छायाचित्र कधी टिपले?
फ्रान्समध्ये सुरूवात झालेल्या जागतिक छायाचित्र दिनाला सुमारे पावणे दोनशे वर्षांचा इतिहास आहे. लुईस द गेरो आणि जोसेफ नायफोर यांनी 1837 मध्ये दगेरोटाईप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला. यामुळे छायाचित्रण सोपे बनले. साधारण सन 1800 मध्ये कॅमेरा ही कल्पना विचारात आली. त्यानंतर 1839 च्या दरम्यान व्यावसायिक छायाचित्रकलेचा जन्म झाला. इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॅमेरा 1990 मध्ये जन्माला आला. सध्या छायाचित्रण व्यवसाय नव्या क्रांतीच्या मार्गावर आहे.
पहिला फोटो कोणी काढला?
जोसेफ निकफेर निएपेस यांनी सर्वात पहिला फोटो काढल्याचे सांगितले जात आहे. जोसेफ यांनी १९२६ ते १९२७ दरम्यान फ्रान्सच्या बरगंडी प्रदेशातील 'द ग्रास' येथील एका खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याचे पहिले छायाचित्र टिपले होते. जगभरातल्या छायाचित्रकारांनी १९ ऑगस्ट २०१० साली पहिल्या जागतिक दिनाचे आयोजन केले होत या कार्यक्रमात जगभरातून अनेक छायाचित्रकारांनी भाग घेतला होता. याच चित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांना १०० हून अधिक दे.शांनी पाहीले. त्यामुळे १९ ऑगस्ट हा दिन जागतिक छायाचित्र दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला