Sarvepalli Radhakrishnan (Photo Credits: Twitter)

भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांची जयंती शिक्षक दिन (Teacher's Day) म्हणून साजरी केली जाते. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे स्मरण केले जाते. म्हणूनच त्यांच्या जयंती दिवशी भारतभर शिक्षक दिन (Teachers’ Day 2021 in India) ​साजरा केला जातो. शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे. जी माणसाला आयुष्यात अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवते. भलेही माणसाला आई-वडील जन्म देतात. परंतू, शक्षक आपल्या मेहनतीने विद्यार्थी घडवतात. ज्यातून हेच विद्यार्थी पुढे जबाबदार नागरिक आणि देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणारे व्यक्तीमत्व ठरतात. 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन (Teachers' Day 2021) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकांचा सन्मान केला जातो. विद्यार्थी आणि शिक्षकांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला अक महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा ध्यानात घेऊनच शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 या दिवशी झाला. डॉ. राधाकृष्णन हे एक थोर आणि विद्वान शिक्षक होते. त्यांनी आपल्या आयुष्याची 40 वर्षे एका शक्षकाच्या रुपात भारताची एक पिढी घडवण्यासाठी दिली. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान विचारात घेऊन 5 सप्टेंबर हा दिवश शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. (हेही वाचा, Teachers Day Speech in Marathi: कोविडचे नियम पाळून असा साजरा करा शिक्षक दिन, जाणून घ्या वर्चुअल भाषणच्या काही टीप्स)

डॉक्टर राधाकृष्णन हे राष्ट्रपती असताना घडलेला एक किस्सा नेहमी सांगितला जातो. डॉक्टर राधाकृष्णन हे राष्ट्रपती झाल्यावर त्यांचे काही मित्र त्यांना भेटायला गेले. त्यांनी राधाकृष्णन यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली. यावर राधाकृष्णन यांनी सांगितले की, माझा जन्मदिवस जर शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला खूप आनंद होईल. तो मी माझा सन्मान समजेल. त्यानंतर 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन (Teachers day) म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. आजही 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणूनच साजरा केला जातो