Chandra Grahan 2019: 21 जानेवारीला वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण, जाणून घ्या वेळ आणि खास गोष्टी
Chandra Grahan 2018 (Image: Getty)

Moon Eclipse 2019: नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात दुसरे ग्रहण असणार आहे. 6 जानेवारीला झालेल्या सुर्यरग्रहणानंतर 21 जानेवारी चंद्रग्रहण असणार आहे. वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे 'सुपर ब्लड वुल्फ मून' (Super Blood Wolf Moon) या नावाने ओळखले जाईल. ग्रहणाच्या दिवशी चंद्राचा रंग तांब्याप्रमाणे लालसर होतो, म्हणून त्याला 'ब्लड वुल्फ मून' म्हटले जाते.

चंद्रग्रहणाची वेळ काय?

भारतीय वेळेनुसार, 20 जानेवारीला सकाळी 10 वाजल्यापासून ग्रहण सुरु होईल आणि 21 जानेवारीला संध्याकाळी 3:33 मिनिटांनी ग्रहण संपेल. त्यानंतर कूल चंद्रग्रहण रात्री 11:41 मिनिटांनी सुरु होईल. नववर्षात कधी असेल सूर्य, चंद्र ग्रहण; जाणून घ्या

चंद्रग्रहणासंबंधित खास गोष्टी:

# हे वर्षातील पहिले चंद्रग्रहण असून हे पूर्ण चंद्रग्रहण असेल.

# या ग्रहणानंतर 16 जुलैला या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होईल.

# हे ग्रहण मध्य प्रशांत महासागर, उत्तर/दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेतून दिसणार आहे.  भारतातून हे ग्रहण दिसणार नाही.

# 2021 पर्यंतचे हे शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. यापूर्वीचे पूर्ण चंद्रग्रहण 27 जुलै 2018 मध्ये झाले होते.

पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधून पास होताना सुर्याची किरणं थेट चंद्रावर पडण्यास अडथळा निर्माण होतो. मात्र पृथ्वीच्या कडातून काही प्रमाणात सुर्यकिरणं चंद्रावर पडतात आणि चंद्र लालसर भासू लागतो. त्यामुळे या चंद्रग्रहणाला 'सुपर ब्लड मून' म्हणतात. पूर्ण चंद्रग्रहणाच्या वेळी सुर्य, पृथ्वी आणि चंद्र बरोबर एका रेषेत येतात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने नेहमीपेक्षा जास्त मोठा आणि प्रकाशमान दिसतो.