Sun, Moon Eclipse in 2019: डिसेंबर महिना सुरु झाला की, वेध लागतात ते नववर्षाचे. मग विविध क्षेत्रासाठी नवे वर्ष कसे असेन यााबत माहिती जाणून घ्यायला सुरुवात होते. अनेकांना सर्वाधिक रुची असते पंचांग आणि ज्येतिषशास्त्रात. आणि ज्येतिषशास्त्रात म्हटले की, सूर्य ग्रहण (Sun Eclipse) आणि चंद्र ग्रहण (Moon Eclipse) वेगळे करताच येत नाही. कारण सूर्य आणि चंद्र ग्रहणाचा मोठा प्रभाव राशींवर पडतो, असे अभ्यास सांगतात. म्हणूनच पंचांग आणि ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या मंडळींसाठी येत्या 2019 या वर्षात ग्रहणस्थिती कशी असेल. कोणत्या तारखेला ग्रहण असेल याबाबत माहिती देत आहोत.
सूर्य ग्रहण
सन 2019मध्ये एकूण ३ सूर्य ग्रहणं असतील. यातील २ भारतात दिसणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारीतच दोन ग्रहणं असतील. यातील एक सूर्य तर दुसरे चंद्र ग्रहण आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्य ग्रहण असेल. शक्यता आहे की, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. जानेवरीच्या 6 तारखेस हे ग्रहण प्रभावी असण्याची शक्यता आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे ग्रहण सकाळी 5.4 मिनिटांनी सुरु होईल आणि रात्री 9.18 मिनीटांनी संपेन.
या वर्षातील दूसरे सूर्य ग्रहण 2 जुलै रोजी असेन. हे ग्रहण पूर्णाकृती सणार आहे. पण, ते भारतात दिसणार नाही. सूर्यग्रहणाचा कालावधी रात्री 11.31 मिनिटे ते 2.15 मनिटे असा राहणार आहे. 2019मधील तिसरे ग्रहण डिसेंबर महिन्यातील 26 तारखेला असेन. या ग्रहणाचा कालावधी 8.17 ते 10.57 इतका असेन.
चंद्र ग्रहण
2019मध्ये एकूण 2 चंद्र ग्रहणं असणार आहेत. त्यातील एक भारतासह एशियायी देशांध्ये दिसेन. पण, हे चंद्र ग्रहण दिवसा लागणार आहे. या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच 21 तारखेला असणार आहे. या ग्रहणाचा कालावधी सकाळी 9.3 ते दुपारी 12.21 मिनिटांपर्यंत असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. (हेही वाचा, अंतराळातील कचरा ठरतोय नवीन डोकेदुखी)
2019मधील दुसरे चंद्र ग्रहण जुलै महिन्याच्या 16 तारखेला लागेन. अंशीक असणारे हे चंद्र ग्रहण भारतासह एशियायी देशांमध्ये पाहायला मिळेल. या ग्रहणाचा कालावधी रात्री 1.31 ते सकाळी 4.29 मिनीटांपर्यंत असणार आहे.