Surya Grahan 2019: 6 जानेवारीला नववर्षातलं पहिलं सूर्यग्रहण,भारतातून दिसणार का हे ग्रहण?
Partial Solar Eclipse (Photo Credits: Pixabay)

Solar Eclipse 2019 : नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सूर्यग्रहण (Solar Eclipse) आहे. 6 जानेवारी 2019 म्हणजे येत्या रविवारी अवकाशात सूर्यग्रहण आहे. जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो तेव्हा त्याची सावली पृथ्वीवर पडते. या भौगोलिक घटनेला आपण ग्रहण म्हणतो. 6 जानेवारीला होणारे ग्रहण आंशिक सूर्यग्रहण (Partial Solar Eclipse)  आहे.

सूर्यग्रहणाची वेळ -

भारतीय वेळेनुसार हे ग्रहण  6 जानेवारी सकाळी 5.04 वाजता सुरू होईल आणि रात्री 9.18 वाजता हे सूर्यग्रहण संपणार आहे. Grahan 2019: नववर्षात कधी असेल सूर्य, चंद्र ग्रहण; जाणून घ्या

भारतामध्ये 6 जानेवारीच्या सूर्यग्रहणाचा प्रभाव पडणार का ?

6 जानेवारीला सूर्यग्रहण होणार असले तरीही हे ग्रहण भारतामधून दिसणार नाही.

उत्तर पूर्व आशिया, उत्तर पॅसेफिक देशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. जपान, कोरिया,मंगोलिया, तायवान आणि रूस, चीन या भागामध्ये पूर्वे दिशेला आणि अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे. बीजिंगमध्ये सूर्यग्रहणादरम्यान सूर्याचा 20% भाग, टोकियोमध्ये 30% भाग आणि व्लादिवोस्टकमध्ये 37% भाग चंद्रामागे लपणार आहे.

पूर्ण सूर्यग्रहण आणि आंशिक सूर्यग्रहण यामध्ये नेमका फरक काय?

पूर्ण सूर्यग्रहणामध्ये चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये आल्याने दिवस असूनही अंधार पसरतो. मात्र आंशिक सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी आणि सुर्य यांच्यामध्ये काही विशिष्ट भागावरच चंद्र येतो त्यामुळे सूर्यकिरण काही प्रमाणातच चंद्रामुळे अडवली जातात. सूर्यग्रहण किंवा आंशिक सूर्यग्रहण थेट उघड्या डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी खास प्रोटेक्टिव्ह आयव्हेअर्स वापरण्याचा सल्ला दिला जातो.

ग्रहण ही केवळ एक भौगोलिक घटना असली तरीही भारतीय समाजामध्ये याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. ग्रहणादरम्यान चांगल्या गोष्टी, नव्या कार्याची सुरूवात टाळावी असा समज आहे.