
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेत्यांपैकी एक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose). नेताजींचा जन्म दिवस यंदा म्हणजेच 2021 पासून पराक्रम दिवस (Parakaram Diwas) म्हणून साजरा करण्यास सुरूवात होत आहे. ब्रिटीशांच्या सत्तेला भारताला हद्दपार करण्यासाठी त्यांनी देशात आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यांनी दिलेला जय हिंद हा नारा आजही देताना प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येते. ओडिशाच्या कटक मध्ये नेताजींचा 23 जानेवारी 1897 दिवशी जन्म झाला होता. एका श्रीमंत घराण्यात त्यांचा जन्म झाला असला तरीही त्यांनी आपलं जीवन देशसेवेसाठी अर्पण केले. आज त्यांच्या 125 व्या जन्मदिनी त्यांच्याच विचारांचा वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी शेअर करा त्यांचे काही बहुमोल विचार! नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती आता प्रत्येक वर्षी 'पराक्रम दिन' म्हणून साजरी केली जाणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
कॉंग्रेस पक्षामध्ये असणार्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मे 3, 1939 रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक या आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष स्थापन करण्यात आला. त्यानंतर नाझी जर्मनीतील वास्तव्य ते हिटलरची भेट अशा अनेक गोष्टींमुळे सुभाषचंद्र बोस चर्चेमध्ये होते.





नेताजींनी महात्मा गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख सर्वात प्रथम केला होता. 1944 साली आझाद हिंद रेडियो च्या माध्यमातून केलेल्या भाषणात आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला होता. दरम्यान नेताजी सुभाषाचंद्र बोस यांचा मृत्यू हे एक गुढ आहे. ऑगस्ट 1945 नंतर ते बेपत्ता झाले.