आझाद हिंद फौजेचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांची 125वी जयंती पूर्वी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तर ANI यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जानेवारीला नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस 'पराक्रम दिन' (Parakram Diwas) म्हणून साजरा केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. केंद्र सरकारने सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधित उच्च स्तरीय कमेटीचे नेतृत्व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
85 सदस्य असणाऱ्या या कमेटीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह काही राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यासह पक्ष-विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते आणि नेताजींच्या परिवारातील सदस्य यामध्ये सहभागी असणार आहेत. नेताजी यांच्या संबंधित कार्यक्रमांची सुरुवात 23 जानेवारीला असणाऱ्या त्यांच्या जयंती पासून सुरुवात होणार आहे.नरेंद्र मोदी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात 23 जानेवारील कोलकाता मधील ऐतिहासिक विक्टोरिया मेमोरियल हॉल येथून करणार आहे.(Republic Day 2021: Attari border वर यंदा प्रजासत्ताक दिनी Coordinated Parade कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द)
Tweet:
Government of India has decided to celebrate the birthday of Netaji Subhash Chandra Bose, on 23rd January, as 'Parakram Diwas' every year: Ministry of Culture pic.twitter.com/Cg0P8gjyFt
— ANI (@ANI) January 19, 2021
संस्कृती मंत्रालयाने नुकत्याच नेताजी यांची 125वी जयंती साजरा करण्याबद्दल एक उच्च स्तरीय कमेटीची नेमणूक करण्याची सूचना दिली होती. नेताजी यांच्या संबंधित कार्यक्रमाचे आयोजन कोलकाता, दिल्लीसह नेताजी आणि आझाद हिंद फौज बद्दल देश-विदेशातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. याआधी सुद्धा नेताजी यांची आझाद हिंद फौजेच्या 75व्या स्थापनेचा सोहळा ही अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला होता. त्या सोहळ्याला नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती.