Republic Day 2021: Attari border वर यंदा प्रजासत्ताक दिनी Coordinated Parade कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द
Wagah Border | (Photo Credit: PTI)

भारताचा यंदाचा प्रजासत्ताक दिन आता अगदी आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. अशामध्ये आता बीएसएफ कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी कोविड 19 संकटामुळे अटारी बॉर्डरवर भारत -पाकिस्तान कडून होणारा एकत्र परेडचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी सीमेच्या दोन्ही बाजूंकडून होणारी परेड पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी असते. पण यंदा हे आकर्षण नसेल. कोरोनामुळे मुळे अटारी बॉर्डरवर अद्यापही सामान्यांना प्रवेशबंदी कायम राहणार आहे.

दरम्यान भारताकडून यंदा जॉईंट किंवा को-ऑर्डिनेटेड परेड नसली तरीही नियमित वेळापत्रकानुसार, फ्लॅग लोअरिंग केले जाईल. अशी माहिती बॉर्डर सिक्युरिटी फॉर्स कडून देण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 7 मार्चपासून अटारी बॉर्डरवर सामान्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. Republic Day Parade 2021: कोरोना विषाणूमुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून परदेशी नेते उपस्थित नसतील; 55 वर्षांची मोडली परंपरा .

सूत्रांच्या माहितीनुसार, अटारी बॉर्डरवर पाकिस्तानच्या बाजूने नागरिकांना अटारी बॉर्डरवर प्रवेशास मुभा देण्यात आली आहे. भारतामधून तो भाग दिसत असल्याने असे सांगितले जात आहे. सध्या भारत-पाकिस्तान यांच्यामधील संबंध ताणले गेले असल्याने महत्त्वाच्या दिवशी दिली जाणारी मिठाई देखील यंदा दिली जाणार नाही. सध्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काय केले जाणार? याबाबत बैठकीमध्ये निर्णय घेतले जाणार आहे. पुढील आठवडाभरात याबाबत मिटिंग होईल अशी माहिती बीएसएफ कडून देण्यात आली आहे.