BSF Soldier | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

Firing On India-Bangladesh Border: बांगलादेशमध्ये सत्ता बदलल्यापासून भारताच्या सीमेवर सातत्याने अप्रिय घटना घडत आहेत. कधी गोळीबाराच्या बातम्या येत राहतात तर कधी संघर्षाच्या. दरम्यान, पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर (India-Bangladesh Border) पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शुक्रवारी येथे घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना एका अज्ञात व्यक्तीला ठार केले. या चकमकीत एक जवान जखमी झाला.

दार्जिलिंग जिल्ह्यातील खालपारा गावाजवळ घडली घटना -

शुक्रवारी पहाटे दार्जिलिंग जिल्ह्यातील खालपारा गावाजवळ ही घटना घडली. बीएसएफच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, 15 ते 20 बांगलादेशी लोकांचा एक गट बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसला होता. हे लोक गुरेढोरे आणि बंदी घातलेल्या वस्तूंच्या तस्करीसाठी भारतीय क्षेत्रातील गुन्हेगारांशी संगनमत करत आहेत. (हेही वाचा - Secret Tunnel in Bengal: बनावट सोन्याची तस्करी करण्यासाठी आरोपीने भारत- बांग्लादेश सीमेवरपर्यंत बांधला होता बोगदा)

हल्लेखोरांनी धारदार शस्त्रे आणि काठ्यांनी केला हल्ला -

जेव्हा बीएसएफच्या गस्ती पथकाने त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, तेव्हा सर्व हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रे आणि काठ्यांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी एका सैनिकाकडून शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. आपल्या जीवाला धोका आहे असे वाटून, जवानाने आपल्या रायफलमधून गोळीबार केला. त्यानंतर घुसखोर पळून गेले, असंही बीएसएफच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. (Indo-Bangla Border वर 89 रोहिंग्या पकडले, BSF कडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित वस्तू जप्त)

बीएसएफ जवान गंभीर जखमी -

या चकमकीत बीएसएफचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. बांगलादेशी तस्करांनी सीमेवरील सुरक्षा कुंपणाचे नुकसान केले. मृतांचे राष्ट्रीयत्व उघड करता येणार नसल्याचंही प्रवक्त्यांनी सांगितले.