
Netaji Subhash Chandra Bose Marathi Quotes: नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांचा जन्म 23 जानेवारी 1897 दिवशी ओडिसा मधील कटक मध्ये झाला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशातील युवकांना सुभाषचंद्र बोस यांनी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे आजही त्यांचा उल्लेख 'नेताजी' असा आदराने केला जातो. सुरूवातीला कॉंग्रेस पक्षामध्ये असणार्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मे 3, 1939 रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक या आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष स्थापन करण्यात आला. त्यानंतर नाझी जर्मनीतील वास्तव्य ते हिटलरची भेट अशा अनेक गोष्टींमुळे सुभाषचंद्र बोस चर्चेमध्ये होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी निवडलेल्या वाटांमध्ये साहित्याच्या विविध माध्यमातून त्यांनी भारतीयांना प्रेरणा दिली आहे. मग यंदा त्यांच्या 123 व्या जयंतीचं औचित्य साधत नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांचे विचार पुढील पिढीला पोहचवण्यासाठी त्यांचे हे विचार शेअर करा.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार

आपल्याला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्म हेच कर्तव्य आहे. कर्मफळाचा अधिकार आपला नाही त्याचा आहे. - नेताजी सुभाषचंद्र बोस

वेळे आधीच परिपक्वता येणं चांगलं नाही. ते वृक्षाच्या बाबतीत असो अथवा व्यक्तींच्या. कालांतराने त्याचे परिणाम भोगावे लागतात. - नेताजी सुभाषचंद्र बोस

समस्येचे निदान, संघर्ष आणि निराकारण या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. समस्येचे निराकारण होईपर्यंत लढा चालू ठेवला पाहिजे. - नेताजी सुभाषचंद्र बोस

जीवनात शंका आणि संदेह सतत निर्माण होत राहिल्या पाहिजे आणि त्याच्या निराकरणासाठी प्रयत्न चालू ठेवले पाहिजे हाच जीवनाच्या प्रगतीचा अर्थ आहे. - नेताजी सुभाषचंद्र बोस

सर्वसामान्य माणसाला यशोमंदिराकडे नेणार्या पायर्या म्हणजे केवळ सततोद्योग आणि सदव्यवहार. - नेताजी सुभाषचंद्र बोस
नेताजी सुभाषचंद्र बोस ही एक अशी व्यक्ती आहे ज्यांच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे. 2र्या महायुद्धाच्या दरम्यान जपानहून नेताजींनी आंबेडकर यांच्याकडे पत्राद्वारा मदत मागितली होती. नेताजींचं विमान तायवानमध्ये क्रॅश झालं. तेथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात करण्यात आले. तायवानकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 1945मध्ये मरणार्या 200लोकांच्या यादींमध्ये नेताजींचं किंवा त्यांच्या साथीदारांचे नाव नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं गुढ कायम आहे.