Shravan Month 2022 Messages in Marathi: फाल्गून मास सुरु झाला की सर्वांना वेध लागतात ते म्हणजे गुढीपाडवा केव्हा येतो. हिंदू पंचागानुसार मराठी नववर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरु होते. हिंदू पंचागात प्रत्येक महिन्याचे खास असे आगळेवेगळे महत्त्व असते. त्यामुळे गुढी पाढव्याला नवे पंचांग घरात आले की सर्वांची नजर खिळते श्रावण महिन्यावर. खरे तर श्रावण महिना हा मराठी महिन्यांचा राजाच म्हणायला हवा. या महिन्यामध्ये सणांची रेलचेल असते. पूजा, उपवास, वृतवैकल्ये अशा नाना गोष्टी. या महिन्यात वरुनराजाचीही कृपा असल्याने सृष्टी कशी हिरवाईने नटते. अशा या महिन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. श्रावण महिन्याचे औचित्य साधत एकमेकांना शुभेच्छा (Shravan Month 2022 Wishes & Messages) देण्याची पद्धत असते. त्यामुळे आपणही HD Images, Quotes, Greetings, Messages शेअर करत श्रावण मासारंभ डिजीटल रुपात साजरा करु शकता. त्यासाठी आवश्यक इमेज आम्ही येथे देत आहोत. [हे देखील वाचा: Shravan Mass 2022 Wishes: पवित्र श्रावण महिन्याच्या मराठी शुभेच्छा, Wishes, Messages, Quotes, Images शेअर करुन साजरा करा श्रावण मासारंभ!]
हिंदू पंचागानुसार श्रावन हा वर्षातील पाचव्या क्रमांकाचा महिना आहे. हा महिना महाराष्ट्रात 29 जुलै 2022 पासून सुरु होत आहे. वर स्षष्ट केल्याप्रमाणे श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते. महिन्यात पहिल्यांदा येतो तो नागचतुर्थीचा उपवास (भावाचा उपवास) पासून होते. हा उपवास 1 ऑगस्टपासून सुरु होत आहे. याशिवाय याच दिवशी (1 ऑगस्ट) श्रावणातील पहिला सोमवारही आहे बरं. ज्याला शिवामूठ तांदूळ असेही म्हटले जाते.
श्रावणातील पहिला सोमवार संपला की लगेच येते ती नागपंचमी(Nag Panchami 2022. यंदा नागपंचमी 2 ऑगस्टला येत आहे. याच दिवशी मंगळागौर पूजनही आहे. मंगळागौरीनंतर 3 ऑगस्टला श्रियाळ षष्ठी आणि कल्की जयंती येत आहे.
श्रावणातील पहिली आणि वर्षातील दुसरी पुत्रदा एकादशी 8 ऑगस्ट रोजी येत आहे. ही एकादशी वर्षातून दोन वेळा येते. पहिला पुत्रदा एकादशी व्रत पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ठेवले जाते. दुसरे पुत्रदा एकादशी व्रत श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळतात.
दुसरा श्रावणी सोमवार 8 ऑगस्ट रोजीच येतो आहे. या सोमवारला श्रावणी सोमवार शिवामूठ (तीळ) म्हणतात. 9 ऑगस्ट रोजी मंगळागौर पूजन. लगेच 11 ऑगस्टला नारळी पोर्णिमा येत आहे. नारळी पौर्णिमा हा खास कोळी बांधवांचा सण आहे. तर याच दिवशी रक्षाबंधनही असते. भावा बहिणींच्या नात्याचे पवित्र बंधन या दिवशी पाहायला मिळते.
वरदलक्ष्मी व्रत येत आहे 12 ऑगस्ट रोजी. तर श्रावणातील तिसरा सोमवार येतो आहे 15 ऑगस्ट रोजी. तिसरा श्रावणी सोमवार (शिवामूठ मूग) आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी येत आहेत. श्रीकृष्ण जयंती येते आहे 18 ऑगस्टला. तर दहिहंडी आहे 19 ऑगस्ट रोजी. कालाष्टमीसुद्धा याच दिवशी (19 ऑगस्ट) आहे.
श्रावणातील चौथा सोमवार म्हणजे शिवामूठ जव येतो आहे 22 ऑगस्ट रोजी. 26 ऑगस्ट रोजी पोळा (श्रावण अमावस्या), पिठोरी अमावस्या येते आहे.