Shiv Jayanti Wishes in Marathi: शिवजयंतीच्या शुभेच्छा खास Images, Messages, Whatsapp Status द्वारे देऊन साजरा करा शिवरायांचा जन्मदिवस
Shiv Jayanti 2021

Shiv Jayanti Wishes in Marathi: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जन्मतारखेवरून अनेक वाद आहेत. महाराष्ट्र सरकारने 2001 साली फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 (शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. मात्र इतर संभाव्य तारखांमध्ये वैशाख शुद्ध द्वितीय म्हणजेच, 6 एप्रिल 1627 ही एक जन्मतारीख मानली जात होती. याच दोन्ही तारखांबाबत वाद होते. महाराष्ट्रामध्ये काही लोक अजूनही वैशाख शुद्ध द्वितीयेला महाराजांची शिवजयंती (Shiv Jayanti Tithi 2021) साजरी करतात. त्यानुसार उद्या, 13 मे 2021 रोजी काही ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाईल.

1869 साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. पुढे शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी 1870 मध्ये पहिल्यांदा शिवजयंती सुरू केली. उद्या परंपरेनुसार शिवजयंती साजरी केली जाईल. त्यानिमित्ताने Images, HD Wallpaper, WhatsApp, Facebook Status, Messages, Wishes द्वारे शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.

इतिहासाच्या पानावर,

रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, 

राज्य करणारा राजा म्हणजे, राजा शिवछत्रपती..|

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2021

सिंहाची चाल… गरुडाची नजर...

स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन...

असेच असावे मावळ्यांचे वर्तन…

हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण...

जय शिवराय... शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2021

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता

झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता

जय भवानी…. जय शिवाजी

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2021

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,

देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2021

एक विचार समतेचा… एक विचार नितीचा

ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2021

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 1966 मध्ये एक समिती स्थापन करून त्यांना, शिवाजी महाराजांची जन्मतारीख निश्चित करण्यास सांगितले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबाबत ठोस कागदपत्रे उपलब्ध नव्हती. जन्मतारखेबाबत कोणतेही पुरावे न मिळाल्याने या समितीच्या बैठकीमध्ये एकमत झाले नाही.

अशा परिस्थितीत तारीख निश्चित करण्याची जबाबदारी सरकारवर सोपविण्यात आली. त्यावेळी, जोपर्यंत कोणताही पुरावा मिळत नाही तोपर्यंत महाराजांची जयंती वैशाख शुद्ध द्वितीयेला साजरी होईल असे ठरले. पुढे 2001 मध्ये 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली तरीही काही ठिकाणी परंपरेनुसार शिवजयंती साजरी करण्याची प्रथा आहे.