
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. आज कित्येक मुली, महिला केवळ सावित्रीबाईंच्या प्रयत्नांमुळे चूल आणि मूल च्या संकल्पनेमधून बाहेर पडून मोठी भरारी घेऊ शकल्या आहे. अनेकींना शिक्षण घेण्याचा आणि स्वावलंबी बनण्याचा अनुभव केवळ सावित्रिबाईंमुळे मिळू शकला आहे. म्हणूनच आज (3 जानेवारी) त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना स्मरून आदरांजली अर्पण करण्यासाठी ही खास मराठमोळी ग्रिटिंग्स, Wishes, WhatsApp Status, Messages शेअर करून या दिवसाचं महत्त्व प्रत्येकी पर्यंत पोहचवूया!
पती ज्योतिबा फुले यांनी पत्नी सवित्रीला शिक्षणाचे धडे दिले. नंतर सावित्रिबाईंनी आपल्या शिक्षणाचा फायदा स्वतः पुरता मर्यादित न ठेवता विद्यादान करण्यास सुरूवात केली. समाजाचा रोष, वाईट वागणूक पत्करून त्यांनी प्रतिकूल स्थितीवरही मात करत केली. त्यामुळे त्यांच्या संघर्षाची आजही प्रेरणा घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 'बालिका दिवस' (Balika Din 2024) साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. महिला शिक्षण दिन म्हणून देखील हा दिवस साजरा होतो. Savitribai Phule Quotes In Marathi: सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त Greetings, WhatsApp Status, Wallpapers द्वारे शेअर करा क्रांतीज्योती सावित्रीचे अनमोल विचार!
सावित्रीबाई फुले जयंती





दरम्यान सावित्रीबाईंचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मुलींच्या शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जाते. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासुन 3 जानेवारीला बालिका दिन साजरा करण्यास सुरूवात झाली आहे.