
Dnyaneshwar Maharaj Jayanti 2020: महाराष्ट्रात भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ म्हणून ओळख असलेल्या संत ज्ञानेश्वर यांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमी झाला आहे. त्यामुळे आज राज्यात गोकुळाष्टमीच्या सोबतीने संत ज्ञानेश्वर यांची देखील जयंती साजरी केली जात आहे. पैठणच्या आपेगावमध्ये 11 व्या शतकात संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. वडिल विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्माला आलेल्या संत ज्ञानेश्वरांना 3 भावंडं होती. संत निवृत्ती हे थोरले तर मुक्ताबाई आणि सोपानदेव ही धाकटी भावंडं होती. संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील 'ज्ञान' आणि साहित्य प्राकृत भाषेमध्ये आणले. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' मध्ये लिहला आहे. हाच ज्ञानेश्वरी ग्रंथ भावार्थदीपिका म्हणून देखील ओळखला जातो. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा दुसरा ग्रंथ म्हणजे 'अनुभवामृत'. विशुद्ध तत्त्वज्ञान आणि जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ म्हणून त्याची ओळख आहे. अवघ्या 21व्या वर्षी समाधी घेतलेल्या ज्ञानेश्वरांनी आपल्या अल्प आयुष्यामध्ये जगाला बहुमोहालाचा संदेश देणार्या रचना, साहित्य यांची निर्मिती केली. आज त्यांच्या जयंतीमिनित्त स्मृतीस वंदन करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ही खास शुभेच्छापत्रं!
आज संत ज्ञानेश्वर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्र WhatsApp,Facebook यांच्या माध्यमातून शेअर करून भागवत संप्रदयातील त्यांच्या अनुयायींचा दिवस खास बनवा.
संत ज्ञानेश्वर जयंती





संत ज्ञानेश्वर जयंती निमित्त त्रिवार अभिवादन
संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्मामध्ये समानता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. महाभारताच्या रणांगणावर रचलेली भगवतगीता त्यांनी मराठी भाषेमधून सर्वसमान्यांपर्यंत पोहचवली. भागवत धर्माचा देखील पाया संत ज्ञानेश्वरांनीच रचला असल्याने त्यांना वारकरी संप्रादयामध्ये विशेष मानाचे स्थान आहे. वारकरी ज्ञानेश्वरांचा उल्लेख 'माऊली' असा करतात.