![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/04/Lord-Ganesha-and-the-moon-784x441-380x214.jpg)
हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे. संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) हे एक व्रत आहे. ते पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. मिठाची संकष्ट चतुर्थी आणि पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवला जातो. या नैवेद्यात गणपती बाप्पाला आवडणा-या मोदकाचा समावेश आर्वजून केला जातो.
20 जुलै 2019 संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्रोदयाची वेळ काय?
आज असणा-या संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्रोदय रात्री 9.51 मिनिटांनी होणार आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त अने गणेशभक्त आपल्या आराध्यासाठी उपवास करतात. त्यानंतर चंद्रोदयानंतर गणेशाची पूजा करुन त्याला गोडाचा नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो.
कशी कराल गणेशाची पूजा:
दर महिन्याला येणा-या संकष्टी चतुर्थीचे व्रत अनेक लोक अगदी भक्तिभावाने करतात. या दिवशी गणपतीची प्रार्थना करुन गणेशाला प्रिय असलेले जास्वंदाचे फूल आणि दुर्वा वाहून गणेशाची मनोभावे प्रार्थना करावी. 108 वेळा श्री गणेशाय नम: मंत्राचा जप करावा. गणपतीला नैवेद्य दाखवावा या गोडाच्या जेवणासोबत गणपतीसाठी खास उकडीचे मोदकही दाखवले जातात. असे केल्यास गणपतीची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते, अशी गणेशभक्तांची श्रद्धा असते.
तसे गणपतीची पूजा कशी करावी हा ज्याचा त्याचा भक्तीचा आणि श्रद्धेचा भाग आहे.
संकष्टी चतुर्थी दिवशी आपली काही मनोकामना पुर्ण करायची असेल तर गणेशाची विधिपूर्वक पूजा करुन त्याला शेंदूर अर्पित करतात. गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवतात.
गणपती ही विद्येची, कलेची देवता असून सर्व संकटे दूर करणारा विघ्नहर्ता आहे. त्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थी निमित्त गणेशाची पूजा केली जाते.