संभाजी महाराज पुण्यतिथी । File Image

छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांचा मृत्यू औरंगजेबाच्या नरक यातना भोगून झाला. फाल्गुन अमावस्येला संभाजी महाराजांचं निधन झाल्याचं जुने जाणते सांगतात. तारखेनुसार 11 मार्च आणि तिथी नुसार शिवप्रेमी संभाजी महाराजांची पुण्यतिथी फाल्गून अमावस्येला पाळतात. यंदा 8 एप्रिलला फाल्गुन अमावस्या असल्याने आजच्या दिवशी संभाजी महाराजांप्रति आदर व्यक्त करत WhatsApp Status, Facebook Messages द्वारा त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेले हे फोटोज डाऊनलोड करून तुम्ही शेअर करू शकाल.

संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक किंवा धर्मवीर असाही केला जातो. औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारून मुसलमान बनल्यास जीवनदान देऊ असं म्हटलं होतं मात्र संभाजी महाराजांनी हा प्रस्ताव फेटाळून मरण पत्करलं.

संभाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

संभाजी महाराज पुण्यतिथी । File Image
संभाजी महाराज पुण्यतिथी । File Image
संभाजी महाराज पुण्यतिथी । File Image
संभाजी महाराज पुण्यतिथी । File Image
संभाजी महाराज पुण्यतिथी । File Image

संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. शिवरायांप्रमाणे त्यांच्या देखील शौर्याचे दाखले दिले जातात. छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर मध्ये पकडण्यात आले होते. एक बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे जात असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने महाराजांच्या नजीकच्या ब्राह्मणांच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला. त्यानंतर त्यांचे हाल करत क्रूरपणे त्यांचा अंत केला.