Republic Day 2019: 26 जानेवारी 2019 ला भारत आपला 70 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करत आहे. या दिवशी भारत प्रजासत्ताक झाला आणि संपूर्ण देशात संविधान (Constitution) लागू झाले. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेत भारताचे संविधान मंजूर करण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी 10 वाजून 18 मिनिटांनी ते संपूर्ण देशात लागू करण्यात आले. लोकशाही प्रधान राष्ट्रांमध्ये भारताचे संविधान सर्वात मोठे आहे. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले आहे. (70 व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर वाजणार नागपूरच्या डॉ. तनुजा नफादे यांनी बांधलेली नवी Shankhnaad Martial Tune, भारतीय अभिजात संगीताच्या मिलाफात नवी धून)
समाजसुधारक, महान नेते, दलितांचे उद्धारकर्ते अशा अनेक रुपांत त्यांनी समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यानिमित्ताने जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही खास गोष्टी...
# बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव आंबेडकर होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील महू या छोट्याशा गावात झाला. ते मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे जिल्ह्यातील होते. मराठी कुटुंबात जन्मलेल्या आंबेडकरांच्या वडीलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते. मागास जातीत जन्म झालेल्या आंबेडकरांना अनेकदा भेदभावाला सामोरे जावे लागले. (प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Stickers, SMS, Facebook Status, Messengers च्या माध्यमातून देण्यासाठी खास मराठी ग्रिटींग्स)
# लहानपणापासूनच हुशार असलेल्या आंबेडकरांनी मुंबईतील एल्फिस्टन रोडवरील सरकारी शाळेत शिक्षण घेतले. त्यावेळेस त्यांना अस्पृशतेचा सामना करावा लागला. 1913 मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची निवड झाली. तेथे त्यांनी राजशास्त्रात पदवी संपादन केली. एका रिसर्चसाठी त्यांना पीएचडी (PHD) देण्यात आली.
# बाबासाहेब लंडनमध्ये अर्थशास्त्रात डॉक्टरेट करायचे होते. मात्र स्कॉलरशिप संपल्यामुळे त्यांना भारतात परत यावे लागले. मायदेशी परतल्यानंतर त्यांनी शिक्षक आणि सल्लागार म्हणून काम सुरु केले. मात्र भेदभावामुळे त्याने मनासारखे यश मिळाले नाही. असंख्य अडचणींनंतर त्यांची मुंबईच्या सिडनेम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली.
# बाबासाहेबांनी 1936 मध्ये स्वतंत्र लेबर पार्टीची स्थापना केली. 1937 च्या निवडणूकीत या पार्टीने 15 जागा जिंकल्या. 'थॉट्स ऑन पाकिस्तान' ,वॉट काँग्रेस अॅड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स' यांसारख्या वादांवर पुस्तके लिहिली.
# बाबासाहेब भारताचे पहिले कायदामंत्री होते. 29 ऑगस्ट 1947 ला भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
# 14 ऑक्टोबर 1956 ला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांनी नागपूरात पाच लाख साथीदारांसह बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. त्यांनी बौद्ध धर्मावर अखेरचे पुस्तक लिहिले. 'द बुद्ध एंड हिज धम्म' असे या पुस्तकाचे नाव असून पुस्तक लिहून पूर्ण झाल्यानंतर तीन दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
भेदभावाचे बळी असलेल्या आंबेडकरांनी तरुणांना शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा उपदेश दिला.