Republic Day Parade Representational Image (Photo Credits: PTI)

Republic Day 2019 Martial Tune: यंदा भारत 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. दिल्लीच्या राजपथावर दरवर्षी चित्ररथ आणि तिन्ही सैन्य दलाची परेड (Republic Day Parade) हा पाहण्यासारखा सोहळा असतो. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अनेक गोष्टी पहिल्यांदा पहायला मिळणार आहेत त्यापैकी एक म्हणजे Martial Tune! भारतामध्ये ब्रिटीश कालीन मार्शल ट्युन (Martial Tune) आजपर्यंत वजावली जात होती. मात्र यंदा त्याऐवजी शंखनाद (Shankhnaad Martial Tune)  होणार आहे.

भारतीय सैन्य दलासाठी यंदा 26 जानेवारी 2019 च्या परेडसाठी खास 'शंखनादा'मध्ये ट्युन बनवण्यात आली आहे. पहिल्यांदाच ही ट्युन राजपथावर वाजवली जाणार आहे. भारतीय अभिजात संगीतातील राग बिलाशखनी तोडी ( Raag Bilaskhani Todi), भैरवी (Raag Bhairavi ) आणि किरवानी( Raag Kirvani) या तीन रागांच्या मिलाफातून बनवण्यात आली आहे. नागपूरच्या डॉ. तनुजा नफादे यांनी ही ट्युन बनवली आहे. महार रेजिमेंटने ब्रिटीश कालीन ट्युन हटवून भरतीय संगीतातील नवी ट्युन वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. Republic Day 2019: दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती Cyril Ramaphosa असतील यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे; असा असेल कार्यक्रम

कशी असेल नवी मार्शल ट्युन?

नवी आणि अधिकृत मार्शल ट्युन डिसेंबर 2017 मध्ये स्विकारण्यात आली. 15 जानेवारी 2019 च्या आर्मी डे परेडमध्ये ही ट्युन वाजवण्यात आली आहे. यावेळेस 14 मिलिट्री बॅन्डसनी ही ट्युन एकत्र वाजवली होती. यंदा पहिल्यांदा सैन्यदलाबाहेरील एखाद्या व्यक्तीने बनवलेली ट्युन राजपथावर वाजवली जाणार आहे. Republic Day 2019: दहशतवादी ते लष्करी अधिकारी अशा प्रवासादरम्यान भारतासाठी बलिदान देणार्‍या नाझीर वाणी यांचा यंदा होणार मरणोत्तर अशोकचक्र देऊन गौरव

भारतीय सैन्य दलाकडून देशभक्तीचं, शिस्तीचं दर्शन घडवणारी खास परेड पाहणं हा डोळ्यांचं पारण फेडणारा अनुभव असतो. तुम्ही उद्या थेट राजपथावर जाऊन हा सोहळा पाहू शकणार नसला तरीही टीव्हीवर या सोहळ्याची क्षणचित्र किंवा दुरदर्शनवर थेट सोहळा पाहू शकणार आहात.