Ashok Chakra 2019 (Photo Credits: Twitter)

Ashoka Chakra 2019: काश्मीर हे भारताचं नंदनवन असलं तरीही या भागामध्ये सतत दहशतवाद्यांचं सावट असतं. आज काश्मीर खोर्‍यातील बारामुल्ला जिल्हा पहिला दहशतवादी मुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. यासाठी अनेक भारतीय जवानांनी हौतात्म्य पत्करलं आहे. अशांपैकी एक म्हणजे शहीद लांस नझीर अहमद वाणी (Lance Naik Nazir Ahmad Wani). नझीर यांचा प्रवास थक्क करणारा आहे. काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या वाणी यांचा मरणोत्तर अशोकचक्र (Ashoka Chakra)  देऊन गौरव होणार आहे.

काश्मीरच्या कुलग्राम अश्मूजी हे नझीरचे मूळ गाव. सुरूवातीला ते दहशतवादी होते. काश्मीरमधील परिस्थिती पाहता तेथील स्थानिकांच्या हातामध्ये बंदुक येणं अगदीच सामान्य  होते मात्र आपण चूकीच्या रस्त्यावर आहोत हे समजताच त्यांनी भारतीय लष्करामध्ये प्रवेश करण्याचं त्यांनी  ठरवलं. 2018 सालच्या जम्मू-काश्मिरच्या शोपिया जिल्ह्यात जवानांसोबत सोबत झालेल्या गोळीबारामध्ये सहा आतंकवादी मारले गेले. या चकमकीमध्ये वाणी यांना वीरमरण आले. Republic Day 2019: दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती Cyril Ramaphosa असतील यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे; असा असेल कार्यक्रम

2004 साली प्रादेशिक सेनेच्या 162 बटालियनसोबत त्यांनी आपल्या करियरची सुरूवात केली. शहीद झाल्यानंतर 21 तोफांच्या सलामीने त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला. वाणी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहे.

जखमी सहकार्‍यांना वाचवताना वाणी यांना वीरमरण आले. दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला आणि गोळीबार होत असतानाही अगदी जवळून दहशतवाद्याला ठार करण्यात वाणी यांना यश मिळालं होतं. यापूर्वी त्यांना दोन वेळा सेना मेडल देऊन गौरवण्यात आले होते. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी वाणी यांचा मरणोत्तर अशोकचक्र(Ashoka Chakra)  हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांकडून स्वीकारला जाणार आहे. तर वाणींसह चार अधिकार्‍यांना कीर्ती चक्र आणि 12 जणांना शौर्य चक्र देऊन गौरवण्यात येणार आहे.