Rani Lakshmibai Punyatithi 2022 HD Images: राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त WhatsApp Status, Messages  शेअर करत मणिकर्णिकाला करा अभिवादन
Photo Credit - File Photo

यावर्षी आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई  (Rani Lakshmi Bai) यांची 164 वी पुण्यतिथी साजरी करणार आहोत. ब्रिटीश राजवटीविरुद्ध पहिली स्वातंत्र्य चळवळ सुरू करण्याचे श्रेय राणी लक्ष्मीबाईंना जाते, ज्यांनी ब्रिटीश सरकारला आव्हान दिले आणि आपण झाशी इंग्रजांच्या ताब्यात देणार नाही असे सांगितले. यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना Whatsapp Status, HD Images च्या माध्यमातून शेअर करुन मणिकर्णिकाला त्रिवार अभिवादन करु या.

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या शुर राणीची आज पुण्यतिथी सर्वत्र साजरी होत आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यामुळे त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ असंही म्हटलं जातं. लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता. लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई 18 जून 1858 मध्ये ब्रिटिश सैन्याशी लढताना धारातिर्थी पडल्या. आज त्यांचा स्मृतिदिन आहे.

Rani Lakshmi Bai Punyatithi 2022 HD Images (Photo Credit - File Photo)

                      Rani Lakshmi Bai Punyatithi 2022 HD Images (Photo Credit - File Photo)

                      Rani Lakshmi Bai Punyatithi 2022 HD Images (Photo Credit - File Photo)

                 Rani Lakshmi Bai Punyatithi 2022 HD Images (Photo Credit - File Photo)

         Rani Lakshmi Bai Punyatithi 2022 HD Images (Photo Credit - File Photo)

युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. इ.स. 1842 मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. सासरी आल्यानंतर मणिकर्णिकेचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. गंगाधरराव यांच्या निधनानंतर राणी लक्ष्मीबाई यांनी स्वत: झाशीची जबाबदारी स्विकारली. राणी लक्ष्मीबाई यांचे कार्य लक्षात घेता ब्रिटिशांनी त्यांचा उल्लेख 'हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला.