Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

Ramadan Moon Sighting 2020 in Saudi Arabia, Kerala, Bahrain, Qatar, Kuwait Live News Updates: जगात अनेक ठिकाणी 23 एप्रिलला पुन्हा चंद्रकोर पाहण्यासाठी प्रयत्न करणार

लाइफस्टाइल Dipali Nevarekar | Apr 22, 2020 09:24 PM IST
A+
A-
22 Apr, 21:24 (IST)

International Astronomical Centre च्या माहितीनुसार आज जगातल्या अनेक भागामध्ये चंद्रकोर दिसलेली नाही. उद्या, 23 एप्रिलला पुन्हा चंद्रकोर पहण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

22 Apr, 21:18 (IST)

 युएई, ओमान, इराक सारख्या देशामध्ये उद्या  शाबान महिन्याचा 29 वा दिवस आहे. त्यामुळे चंद्र दिसला नाही तर शनिवार (26 एप्रिल) पासून रमजानची येथे सुरूवात होईल. सौदीमध्ये  शाबान महिन्याच्या 29 व्या दिवसाचीही चंद्रकोर पहायला मिळेलेली नाही.  

22 Apr, 21:08 (IST)

रमजान ची चंद्रकोर आज Middle East सोबतच जगातच्या कुठल्याच भागात दिसू शकलेली नाही. उद्या (23 एप्रिल) दिवशी संध्याकाळच्या वेळेस पुन्हा चंद्रकोर पाहण्याचं आवाहन  केलं आहे. तज्ञांच्या मते, सौदीकडून शाबान महिन्याच्या दिवसांची गणती करण्यामध्ये काही गोंधळ झाला असू शकतो. त्यामुळे आजुबाजूच्या देशातही रमजान महिना सुरू होण्याचा दिवस एका दिवसाने पुढे जाऊ शकतो. दरम्यान उद्याही चंद्र न दिसण्याची शक्यता आहे.  

22 Apr, 20:45 (IST)

दक्षिण भारतातील केरळ मध्ये आज चंद्र न दिसल्याने यंदाच्या रमजानची सुरूवात शुक्रवार, 25 एप्रिल पासून होईल अशी माहिती KNM Markazudawa यांनी दिली आहे.  

22 Apr, 19:32 (IST)

मक्का येथील ग्रॅंड मशिदीमध्ये मगरिब नंतर 29 व्या हिलाल क्रीसेंट बाबत थोड्याच वेळात घोषणा होणार आहे. 

 

22 Apr, 19:14 (IST)

मक्का येथील मक्का येथील मशिदीमध्ये नमाझ ए मगरिब नंतर 29 व्या हिलाल क्रीसेंट बाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

Ramzan  Moon Sighting 2020:  सध्या जगभरातील मुस्लिम बांधवांमध्ये यंदाच्या 'रमजान' (Ramadan) महिन्याची उत्सुकता आहे. आज सौदी अरेबिया (Saudi Arabia) , बहरीन (Bahrain) , कतार (Qatar) ते अगदी आज भारतातील केरळ प्रांतामध्येही रमजान  (Ramzan)महिन्याची आणि यंदाच्या 'रोझा'(Roza) ची सुरूवात करण्यासाठी चंद्र पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार सुरू महिन्याच्या 29 व्या दिवशी चंद्र दिसला की पुढील नवा महिना सुरू होतो. जर चंद्र दिसला नाही तर महिन्याचे 30 दिवस संपूर्ण होताता आणि नव्या महिन्याची सुरूवात होते. आज आखाती देशांमध्ये KSA, कतार (Qatar) आणि बहरीन (Bahrain)मध्ये शाबान महिन्याचा आज 29 वा दिवस आहे. त्यामुळे या देशांमध्ये यंदाचा रमजान महिना 23 एप्रिल पासून सुरू होणार आहे. जर चंद्र दिसला नाही तर शाबान महिन्याचे 30 दिवस पूर्ण होतील आणि 24 एप्रिलपासून यंदा रमजान महिन्याची धूम सुरू होईल. Ramadan 2020: मुस्लिम बांधवांच्या पवित्र 'रमजान' महिन्यात कोणत्या गोष्टींना परवानगी आणि कोणत्या निषिद्ध घ्या जाणून

Moroccan खगोलशास्त्रज्ञ Abdelaziz Kharbouch Al Ifrani च्या माहितीनुसार यंदा रमजान महिना सौदी अरेबिया, युएई, कतार, कुवेतसह इतर आखाती देशांमध्ये 24 एप्रिलपासून सुरू होईल. मलेशियाने 23 एप्रिल दिवशी चंद्रकोर पाहिली जाईल असे सांगितलं आहे. Ramadan 2020 Date in India: भारतामध्ये रमझान महिन्याला यंदा सुरूवात कधी होणार?

दरम्यान रमजान हा मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्याभराच्या दिवसामध्ये मुस्लिम बांधव दिवसभर कडक उपवास पाळतात. या काळात त्यांना सकाळी सूर्योदयापूर्वी आणि रात्री सूर्यास्तानंतर अन्न पाणी घेण्याची मुभा असते. या महिन्याची सांगता रमजान ईद ने होते. त्यादिवशी सारे जण एकत्र येतात. गोडा-धोडाच्या पदार्थांसोबत एकमेकांना ईदी देतात. यंदा मात्र रमजान महिन्यावर जगभरातच कोरोना व्हायरसचं संकट आहे. या काळात भारत, अमेरिका सारख्या देशात मुस्लिम बांधवांनी घरच्या घरीच सेलिब्रेशन करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान यंदा मशिदीमध्ये नमाज अदा करण्याऐवजी घरी बसूनच प्रार्थना करा असेही आवाहन करण्यात आलं आहे.


Show Full Article Share Now