
Ram Navami 2025 Shubha Muhurat: वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामाचा जन्म राजा दशरथ यांच्या पोटी झाला. श्रीराम हे राजा दशरथ आणि आई कौशल्या यांचे पुत्र होते. पंचांगानुसार, श्री रामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला होता आणि म्हणूनच दरवर्षी या तारखेला राम नवमी (Ram Navami 2025) साजरी केली जाते. रामनवमीला श्रीरामाची पूर्ण भक्तीभावाने पूजा केली जाते. रामललाचा जन्म पुनर्वसु नक्षत्रात दुपारी झाला होता आणि म्हणूनच भगवान रामाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी येतो. या वर्षी रामनवमी 6 एप्रिल, रविवारी येत आहे. रामनवमीला श्री रामाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त, पूजा साहित्य आणि पूजा मंत्र नक्की जाणून घ्या.
रामनवमीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त -
रामनवमीच्या दिवशी रामलल्लाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त अडीच तासांचा असणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1:35 पर्यंत चालेल. या काळात रामनवमीची पूजा करता येते. (हेही वाचा - Ram Navami 2025 Wishes: श्री राम जन्मोत्सवानिमित्त खास Messages, WhatsApp Status, HD Images द्वारे शुभेच्छा देत साजरा रामनवमीचा सण)
रामनवमी पूजा साहित्य आणि पद्धत -
रामनवमीची पूजा करण्यासाठी, पाटावर भगवान राम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानजींच्या मूर्ती ठेवा. सर्वांना पाणी आणि पंचामृत अर्पण करा. आता सर्वांना चंदन आणि फुले अर्पण करा. यानंतर, अगरबत्ती आणि दिवा लावा. आता हंगामी फळे अर्पण करा आणि नैवेद्य दाखवा. तथापी, पूजा साहित्यात केतकी फुले, चंपा, मालती, कमळ, झेंडू, गुलाब आणि कुंदाची फुले समाविष्ट करता येतील. यासोबतच पूजा साहित्यात तुळशी, बिल्वपत्र, कुश, शमी आणि भृंगराज यांची पाने समाविष्ट करता येतील. (हेही वाचा; Ram Navami 2025: अयोध्या राम जन्मभूमी मंदिराला राम नवमी च्या पार्श्वभूमी वर आकर्षक रोषणाई)
श्री रामाला पूजा साहित्य अर्पण केल्यानंतर, आरती करा आणि मंत्रांचा जप करा. या दिवशी श्री रामचरितमानसातील श्लोकांचे पठण करणे देखील खूप शुभ मानले जाते. श्री रामाच्या मंत्रांचा जप करण्यासाठी, उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसा. पिवळ्या किंवा पांढऱ्या आसनावर बसून तुळशीच्या माळांचा जप करणे, अत्यंत शुभ मानले जाते. रामनवमीला पांढरे किंवा पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते. पांढरा आणि पिवळा रंग श्री रामांचे आवडते रंग मानले जातात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. लेटेस्टली मराठी त्याची पुष्टी करत नाही.)