Ram Navami 2025 HD Images

Ram Navami 2025 HD Images in Marathi: नितीमत्ता, कर्तव्य आणि नैतिकतेचे प्रतीक म्हणून प्रभू रामचंद्र (Lord Ram) यांच्याकडे पाहिले जाते. ते भगवान विष्णूंचे सातवे अवतार आहेत. आज, रविवार 6 एप्रिल रोजी देशभरात राम नवमीचा (Ram Navami 2025) सण साजरा होत आहे. चैत्र शुद्ध नवमी या तिथीला प्रभू रामांचा जन्म झाल्याचे मानले जाते. कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालत आहे. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. प्रभू रामांचे महत्त्व फक्त त्यांच्या कथेपुरते मर्यादित नाही. त्यांचे राज्य, ज्याला ‘राम राज्य’ म्हणतात, हे समानता, समृद्धी आणि न्यायाने परिपूर्ण शासनाचे उदाहरण मानले जाते.

या काळात प्रजा सुखी होती, आणि कोणावरही अन्याय होत नव्हता. रामांनी आपल्या वडिलांचा शब्द पाळण्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला, आणि वनवासातही त्यांनी धर्म सोडला नाही. त्यांनी आपल्या पत्नी सीतेसाठी लढा दिला आणि हनुमानासारख्या भक्तांना एकत्र आणले, ज्यामुळे त्यांचे नेतृत्व आणि करुणा दिसून येते. ही मूल्ये आजही समाजाला योग्य मार्ग दाखवतात आणि त्यांचे जीवन आपल्याला सत्य आणि कर्तव्याची शिकवण देते. म्हणूनच राम नवमीच्या उत्सवाचे महत्व आणखी वाढते. यंदा रामनवमी साजरी करण्याचा शुभ मुहूर्त 6 एप्रिल सकाळी 11 वाजून 08 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 39 पर्यंत असेल.

आजच्या या मंगलमय दिवशी खास Messages, Wishes, WhatsApp Status, HD Images द्वारे शुभेच्छा पाठवून साजरा करा श्री राम जन्मोत्सव.

Ram Navami 2025 HD Images
Ram Navami 2025 HD Images
Ram Navami 2025 HD Images
Ram Navami 2025 HD Images
Ram Navami 2025 HD Images

दरम्यान, दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर रामजन्माचा सोहळा साजरा केला जातो. यावेळी श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. त्याची पूजा करून रामजन्माचा पाळणा म्हटला जातो. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटला जातो. राम नवमीच्या उत्सवात अनेक धार्मिक विधी होतात. घरोघरी आणि मंदिरांमध्ये रामायण किंवा तुलसीदासांचे रामचरितमानस यांचे पठण केले जाते. अयोध्या येथे हा सण भव्य स्वरूपात साजरा होत आहे. राम जन्मभूमि मंदिरात यंदा खास ‘सूर्य तिलक’ हळा होईल. या विधीत दुपारी 12 वाजता सूर्यकिरण रामलल्लाच्या मूर्तीच्या कपाळावर पडतील. राम नवमी हा सण फक्त धार्मिक नाही, तर तो सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा उत्सव आहे.