
श्रावणात राखी पौर्णिमा हा सण रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हणून साजरा केला जातो. यंदा 30 ऑगस्ट दिवशी रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे. बहिण-भावाच्या नात्यातील जिव्हाळा या निमित्ताने जपला जातो. बहिण रक्षाबंधन दिवशी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याचं औक्षण करते. भाऊ देखील बहिणीला ओवाळणी आणि आयुष्यभर तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. मग तुमच्या बहिण-भावाचा हाच प्रेमाचा, स्नेहाचा धागा सोशल मीडीयात साजरा करण्यासाठी रक्षाबंधनाचा शुभेच्छा, मराठमोळी ग्रीटिंग्स, Wishes, Messages देत द्विगुणित करायला विसरू नका.
रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने घरा घरात गोडा-धोडाचे पदार्थ बनवले जातात. कोळी बांधव देखील नारळी पौर्णिमा या दिवशी साजरी करत असल्याने अनेकजण नारळाचे पदार्थ देखील बनवतात आणि हा आनंदाचा दिवस अधिक गोड करतात. Raksha Bandhan Gift Ideas 2023: रक्षाबंधन निमित्त बहिणीला गिफ्ट देण्यासाठी 5 आइडिया, 'हे' गिफ्ट देऊन रक्षाबंधन करा खास .
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

सण रक्षाबंधनाचा तुझ्या माझ्या नात्याचा
सण तुझे- माझे प्रेम व्यक्त करण्याचा
रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन
प्रेमाने राहू आपण या पुढे आयुष्यभर
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच मान- सन्मान, सत्कार होतो, तेथे सुशील, गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही हा विचार समाजात रूजवण्याचा प्रयत्न अनेक सण समारंभाच्या माध्यमातून केला जातो. रक्षाबंधनाचा सण देखील हाच विचार देतो.