Raksha Bandhan Gift Ideas 2023: यंदा रविवार, 30 ऑगस्ट बुधवारी रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण साजरा होणार आहे. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व दिले जाते. बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याला जपवून ठेवणारा हा दिवस अंत्यत खास आहे. या दिवशी शुभ मुहुर्तावर बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याला ओवळणी करते. त्याबदल्यात भाऊ आपल्या बहिणीला आशीर्वाद आणि सर्प्राईज म्हणून छानसं गिफ्ट देतो. यंदा तुम्ही काय गिफ्ट देणार आपल्या बहिणीला, त्यासाठी स्वस्तात मस्त असे गिफ्ट देवून तील खूश करा.
१. स्मार्टवॉच- जर तुमच्या बहिणीला जिम किंवा व्यायाम करायला आवडत असेल तीच्यासाठी स्मार्टवॉच देवू शकता. सोबत फिटनेसबँड सुध्दा देवू शकता. स्मार्टवॉच हा उत्तम पर्याय आहे. ज्यामुळे तीला जिम मध्ये किवा व्यायाम करताना स्मार्टवॉचचा वापर करू शकते
२. स्पीकर- एखादा स्पीकर घेवून तीला सरप्राईज देवू शकता. Amazon Echo Dot smart speaker हा स्पीकर देवू शकता. हा पर्याय देखील अगदी 3000 च्या आत ऑनलाईन खरेदी करू शकता.
३.ज्वेलरी- ज्वेलरी देण हा सर्वात मस्त आणि खुश करून देणारा गीफ्ट आहे. ज्वेलरी मध्ये वेगवेगळ्या ब्रॅडचे कानातले झुमके, ट्रेंडी नेकलेस, पारंपारिक कडे किंवा चांदीचे पायल देवू शकता. कमीत कमी किंमती ते जास्तीत जास्त किंमतीमध्ये उपलब्ध असतात.
४. वाईरलेस ईअर बर्ड्स- जर तुमच्या बहिणीला गाण्यांची आवड असेल तर ईअर बर्ड्स देऊन तुम्ही तिचे रक्षाबंधन अगदी खास करु शकता. OnePlus Buds Z ईअर बर्ड्स अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. Realme Buds Air 2 उपलब्ध आहेत. यासोबत Redmi Earbuds 2C 1,498 रुपयांत उपलब्ध आहेत. तीन हजारांपर्यंत तुम्हाला सर्वात चांगले ईअरबर्डस मिळू शकता.
५. बॅग- ऑफिस किंवा फिरण्यासाठी बॅग या असायलाच हव्या. वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी पर्स, हँडबॅग, किवा बॅग हे देखील बहिणीला गीफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. आवडीनुसार किंवा तिच्या गरजांनुसार बॅग गीफ्ट देवू शकता.