बहीण-भावाच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan) . यंदा रक्षाबंधन 11 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून त्याचं औक्षण करते. मग या सणाच्या शुभेच्छा देत तुमच्या बहीण, भावाचा दिवस खास करण्यासाठी मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, HD Images शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता. त्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही खास शुभेच्छापत्र डाऊनलोडकरून ती Facebook, Twitter, Instagram, Telegram द्वारा शेअर करू शकाल.
रक्षाबंधन हा नारळी पौर्णिमेचा देखील सण असल्याने यादिवशी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. प्रामुख्याने नारळ वापरून अनेक पदार्थ बनवण्याची रीत आहे. मग तोंड गोड करण्यासोबतच तुमच्या नात्यातील गोड करण्यासाठी एकमेकांना सोशल मीडीयामध्येही शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद वाढवा. नक्की वाचा: Raksha Bandhan Gifts Under 500: रिमोट कंट्रोलर शटर बटण ते लॅपटॉप स्टँड आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 500 रुपयांच्या आतील हटके भेटवस्तूंची यादी, पाहा
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
ऑनलाईन जमान्यात
सगळं काही फेक आहे
पाठिशी उभा भाऊ
लाखात एक आहे
हॅप्पी रक्षाबंधन
घरची लक्ष्मी ती माझी
गोड बिस्किटाची खारी
निर्मळ बहीण माझी
आहे जगात भारी ...
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्र, सखा, सोबती
सर्व नाती तो बजावतो,
कायम तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा
तो एक मोठा भाऊच असतो..!
रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा
सोबत वाढले सोबत खेळले
प्रेमात न्हाले बालमन
याच प्रेमाची आठवण ठेवत
साजरा करू रक्षाबंधनाचा सण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षाबंधन सणाच्या बहिण-भावंडांना
खूप सार्या शुभेच्छा
रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. यानिमित्ताने बहीण-भाऊ एकमेकांना भेटतात. भावाकडून रक्षणाचं वचन घेत बहीण त्याच्या मनगटावर मायेचा धागा बांधते, त्याचं औक्षण करून गोड घास भरवते. या बदल्यात भाऊ देखील आता बहिणींना भेटवस्तू देतो.