Raksha Bandhan Gifts Under 500: रिमोट कंट्रोलर शटर बटण ते लॅपटॉप स्टँड आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 500 रुपयांच्या आतील हटके भेटवस्तूंची यादी, पाहा
Photo Credit: Pixabay

Raksha Bandhan Gifts Under 500: रक्षाबंधनाची लगबग सुरु झाली आहे. रक्षाबंधन सण यंदा 11 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाची पूर्व तयारी अनेकांची सुरु झाली आहे. बहिण-भावाच्या नात्यामधील जोडवा जपण्यासाठी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाचा सण बहीण-भावाचा प्रेमाचा बंध घट्ट करण्यासाठी साजरा केला जातो. परंतु रक्षाबंधनाला दरवर्षी बहिणीला काय हटके गिफ्ट द्यावं, याचे सर्वात मोठे टेन्शन प्रत्येक भावासमोर असते. तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी काही हटके भेटवस्तूंची यादी घेऊन आलो आहोत, यादीत दिलेले सगळे वस्तू 500 रुपयांच्या आतील किमतीचे आहेत. या यादीमुळे तुम्हाला बहिणीला गिफ्ट घेण्यासाठी जास्त मेहनत नाही करावी लागणार आहे.चला तर मग वेळ वाया न घालवता यादीमधले कोणते गिफ्ट तुमच्या बहिणीला आवडेल ते बघा, आणि तिला गिफ्ट करा. तिच्या आवडीचे गिफ्ट पाहून ती नक्कीच खूप खुश होईल, हे नक्की, पाहा यादी [ हे देखील वाचा:  Raksha Bandhan 2022: बहिणींनी भावांना कधी बांधावी राखी? 11 तारखेला भद्राकाल असल्यामुळे ज्योतिष्यांनी सांगितली योग्य तिथी, जाणून घ्या संपूर्ण माहिती ]

सेल्फी स्टिकसाठी POPIO ब्लूटूथ रिमोट कंट्रोलर शटर बटण:

प्रत्येकाला फोटो काढण्याचा नाद असतो. तुमच्या बहिणीलाही फोटो काढायला आवडते आणि ती नेहमीच तुमच्या कडून फोटो काढून घेत असेल तर हे उपकरण खूप उत्तम आहे. तुम्ही बहिणीचे फोटो काढून ठाकला असाल तर, या नवीन उपकरणाच्या माध्यमातून ती स्वतःच स्वतःचे फोटो काढू शकते.

अॅडजस्टेबल लॅपटॉप स्टँड:

तुमची बहिणजर  लॅपटॉपवर दिवस भर काम करत असेल तर अॅडजस्टेबल लॅपटॉप स्टँड हा एक उत्तम पर्याय आहे. सारख बसून पाठीचे त्रास होतात. या गिफ्टमुळे नक्कीच तिला आनंद होईल. 

हँडबॅग्ज:

हँडबॅग महिलांच्या वॉर्डरोबचा एक आवश्यक भाग आहे. ही एक ऍक्सेसरी आहे जी एक पोशाख बनवू शकते किंवा तोडू शकते. चांगली हँडबॅग तुमच्या फॅशनमध्ये सौंदर्य वाढवू शकते. बाजारात हँडबॅगचे अनेक प्रकार आहेत, परंतु काही अशा आहेत ज्या प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोबमध्ये असाव्यात. राखीवर तुम्ही तुमच्या बहिणीला हँडबॅग देऊ शकता.

ड्रेस:

ऑनलाईन आता अनेक अ‍ॅपवर 500 रुपयांमध्ये खूप सुंदर ड्रेसेस मिळतात. मुलींकडे कितीही कपडे असले तरीही ते कमीच असतात असे म्हंटले तरी चुकीचे ठरणार नाही त्यामुळे हा एक उत्तम पर्याय आहे.

 मेकअप कीट: 

आजकाल अनेक ब्रँड्सवर सेल सुरू आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला मेकअप कीटही गिफ्ट करू शकता. अनेक गोष्टी  500 रुपयांना सहज उपलब्ध होतील. कीट बघितल्यावर तुमच्या बहिणीला सर्वात जास्त आनंद होईल आणि तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

500 रुपय आणि 500 च्या आतील किमतीमध्ये आम्ही काही गिफ्ट तुम्हाला सांगितले आहेत. हटके गिफ्ट असल्यामुळे तुमच्या बहिणीलाही दिलेले गिफ्ट नक्कीच आवडतील.