Raksha Bandhan 2022 Shubh Muhurat: बहिणींनी भावांना कधी बांधावी राखी? 11 तारखेला भद्राकाल असल्यामुळे ज्योतिष्यांनी सांगितली योग्य तिथी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Raksha Bandhan (Wikimedia Commons)

Raksha Bandhan 2022 Shubh Muhurat: यंदा श्रावण महिन्याची पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या तिथी याबाबत बराच गोंधळ निर्माण झाला आहे. जाणून घ्या आमचे ज्योतिषी आचार्य श्री भागवत जी महाराज कोणत्या तारखेला राखी बांधण्याचा सल्ला देत आहेत.रक्षाबंधनाची तारीख जसजशी जवळ येत आहे आणि भावाला राखी 11 ऑगस्टला की 12 ऑगस्टला याबाबत संभ्रम निर्माण झाले आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी, बहिणी आणि भाऊला राखी बांधते. दरम्यान, विविध पंचांगांमध्ये 11 आणि 12 ऑगस्ट या दोन्ही तारखांना राखी बांधण्याचा उल्लेख वेगवेगळ्या युक्तिवादांसह करण्यात आला आहे. त्यामुळे राखी 11 ला बांधावी की 12 ला याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. [हे देखील वाचा: Raksha Bandhan Mehndi Design 2022: रक्षाबंधन निमित्त काढा मेहेंदीच्या हटके डिझाईन, तुमच्या सुंदर हाताचे सौंदर्या दिसेल आणखी खुलून, पाहा व्हिडीओ]

हिंदू धर्मानुसार भाद्र काळात कोणत्याही शुभ कार्याचे नियोजन केले जात नाही, तसेच 11 तारखेला भाद्र पूर्ण होत असल्याने 12 ऑगस्टला राखी बांधण्याच्या सूचना अनेक पंचांगामधून देण्यात येत आहेत. परंतु ज्योतिषाचार्य आचार्य श्री भागवत जी म्हणतात की, 11 ऑगस्टला श्रावण शुक्ल पक्षाची पौर्णिमा आहे, आणि 12 तारखेला सकाळी सातपर्यंतच पौर्णिमा आहे, त्यामुळे रक्षाबंधन हा सण 11 ऑगस्टलाच साजरा करावा.

आचार्यजींनी या संदर्भातील काही ठोस कारणे मांडली आहेत, जाणून घेऊया 

आचार्य श्री भागवत यांनी विविध पंचांगांचा अभ्यास करून सांगितले की,  धर्मसिंधु, नियान सिंधू, पियुष धारा, मुहूर्त चिंतामणी आणि तारा प्रसाद दिव्य पंचांग यांचा अभ्यास केल्यानंतर रक्षाबंधन साजरी करण्याची योग्य तारीख ११ ऑगस्ट आहे. यावर्षी 11 ऑगस्ट 2022 रोजी पौर्णिमा तिथी सकाळी 10.39 पासून सुरू होईल आणि संपूर्ण दिवस राहील. त्याचबरोबर श्रावण नक्षत्र सकाळी 06.53 वाजता सुरु होणार आहे. धर्मसिंधु पंचांगानुसार प्रधानता नक्षत्रावर नाही तर तिथीला दिसते. पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी असून 12 ऑगस्ट रोजी पौर्णिमा फक्त 07.06 पर्यंत आहे. म्हणजेच १२ ऑगस्टला सूर्योदयानंतर केवळ १८ मिनिटांसाठी पौर्णिमा आहे आणि कमी कालावधीसाठी आहे.

11 ऑगस्ट 2022 रोजी भद्रकाल देखील आहे, या संदर्भात आचार्य जी स्पष्ट करतात की, हे खरे आहे की, 11 ऑगस्ट रोजी संपूर्ण काळ भद्रकाल असेल, परंतु भद्रकाल मकर राशीत असल्याने त्याचे निवासस्थान अधोलोकात असल्याचे मानले जाते. याचे वर्णन पीयूषधारामध्ये पुढील श्लोकात केले आहे.

श्लोक :

स्वर्गे भद्रा शुभं कुर्यात् पाताले च धनागम।

मृत्युलोक स्थिता भद्रा सर्व कार्य विनाशनी ।।

श्लोकाचा अर्थ: 

श्लोकाचे तात्पर्य असे आहे की, जेव्हा भद्रा स्वर्गात किंवा अधोलोकात येते तेव्हा पृथ्वीवर शुभ फल देणारे असते. यावरून हे स्पष्ट होत आहे की, 11 ऑगस्ट हा रक्षाबंधनासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे. त्यामुळे गुरुवारी, 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करू शकतात.