Rajguru Birth Anniversary (Photo Credits: File Image)

शिवराम हरी राजगुरू (Shivram Hari Rajguru) भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फासावर चढलेला एक मराठमोळा चेहरा. आज, 24 ऑगस्ट रोजी राजगुरु यांची जयंती आहे. 1908 साली त्यांंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे एका मराठी कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे. वडिलांच्या निधनानंंतर कुटुंंबाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी घेतला. पुढे चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad), भगत सिंग (Bhagat Singh) आणि सुखदेव (Sukhdev) अशा क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले होते.

आजवर जेव्हा जेव्हा राजगुरु यांचे नाव चर्चेत आले तेव्हा ते भगतसिंंह आणि सुखदेव या दोघांंच्या नावाला जोडुनच, यात काही गैर नसलं तरी दुर्दैव असं की राजगुरु यांच्या नावाच्या व्यतिरिक्त अनेकांना त्यांंचे कर्तुत्व व वैयक्तिक माहिती ठाउकच नाही. मात्र आज त्यांंच्या जयंंती निमित्त आपण केवळ राजगुरु यांंच्या आयुष्याविषयी जाणुन घेणार आहोत.

राजगुरु यांच्याविषयी न ऐकलेल्या गोष्टी

-राजगुरूंचा जन्म शिवराम हरि राजगुरु म्हणून पुण्याजवळील खेड येथे झाला.

-वाराणसी येथे ते भारतीय क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. स्वातंत्र्यलढ्यात हातभार लावण्यासाठी उत्साही म्हणून, ते चळवळीत सामील झाले आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी (एचएसआरए) चे सक्रिय सदस्य झाले.

-भगतसिंग आणि सुखदेव यांच्यात सामील होउन आणि लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 1828 मध्ये लाहोर येथे ब्रिटिश पोलिस अधिकारी जे पी सॉन्डर्सच्या हत्येमध्ये भाग घेतला.

-लाला लजपतराय यांच्यावर लाठीमार करणारा उपपोलीस अधीक्षक सॅन्डर्स लाहोरामधील आपल्या कार्यालयाच्या बाहेर निघाला असता राजगुरूने त्यांच्यावर गोळी झाडली.

-राजगुरू 30 डिसेंबर, 1929 मध्ये पुण्यात पकडले गेले. लाहोर कटातील सहभागाबद्दल पुष्कळ क्रांतिकारकांवर खटला चालला.

-नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यांतही राजगुरूंचा सहभाग होता

-भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांनी लाहोर तुरुंगात 23 मार्च, 1931 रोजी फासावर चढून वीरमरण पत्करले.

ब्रिटिश राजवटीविरूद्ध लढताना जहाल विचारसरणी अधिक प्रभावी होती असा त्यांचा विश्वास होता, येन केन प्रकारेण भारत स्वातंत्र्य व्हावा यासाठी त्यांनी महत्वाचा लढा दिला. त्यांच्या जयंंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!