Parshuram jayanti 2019: वैशाख महिन्यामध्ये शुद्ध तृतीयेला साजरा केला जाणारा सण म्हणजे अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2019). हा सण देशभरात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. दरम्यान, या सणादिवशीच भगवान शिवभक्त परशुराम (Parshuram) जयंती असते. परशुरामाने पृथ्वी 21 वेला निक्षत्रीय केली होती असा उल्लेख पुराणात आढळतो. स्कंद पुराण आणि भविष्य पुराणात सांगितल्या प्रमाणे परशुराम यांचा जन्म भृगुश्रेष्ठ महर्षि जमदग्नि द्वारा सम्पन्न पुत्रेष्टि यज्ञातून प्रसन्न झालेल्या देवराज इंद्राच्या वरदानातून पत्नी रेणुका हिच्या गर्भातून झाला. हा जन्म वैशाख शुक्ल तृतीयेला झाला. त्यामुळे परशुरामास विष्णुचा अवतारही मानले जाते. उल्लेखनीय म्हणजे पुराणात परशुराम आणि कोकण यांचे नाते खासअसल्याचे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर, कोकण, गोवा आणि केरळ आदी ठिकाणी परशुरामाची पुरातन मंदिरेही आढळतात. म्हणूनच जाणून घ्या कोकण (Konkan), गोवा (Goa), केरळ (Kerala) आदी ठिकाणी का आढळतात परशुराम यांची मंदिरे?
परशुरामाचा उल्लेख रामायण, महाभारत, भागवत पुराण आणि कल्कि पुराण इत्यादींमध्ये आढळतो. या उल्लेखानुसार परशुरामांनी पृथ्वीला 21 वेळा निक्षत्रीय केले होते. असेही सांगितले जाते की, भगवान परशुराम यांना वैदिक संस्कृतिचा प्रचार-प्रसार करायचा होता. भारतातील अनेक गावे परशुरामामुळेच वसली आहेत. यात कोकण, गोवा आणि केरळचाही समावेश आहे. पौराणिक कथांचा आधार घ्यायचा तर त्यात परशुरामांनी बाण मारुन समुद्र पाठीमागे ढकलला आणि नव्या भूमिचे निर्माण केले. याच कारणामुळे कोकण, गोवा आणि केरळमध्ये परशुरामाची मंदिरे आढळतात आणि त्यांना वंदनीयही मानले जाते, असे सांगतात.
दरम्यान, हिमालयातील एका विशिष्ठ ठिकाणी आपल्या आईला भेटण्यासाठी आजही परशुराम येत असतात, अशी अख्यायीका आहे. हे ठिकाण दिव्यस्थान म्हणूनही ओळखले जाते. हिमाचल येथील सिरमौर जिल्ह्यातील रेणुका झिल येथे हे ठिकाण आहे. रेणुका झील पूर्वी राम सरोवर नावाने ओळखले जात असे. रेणुका झिल हे परशुरामाच्या मातेचे स्थायी निवास मानले जाते. इथे ती गेली अनेक शतके वास करुन असल्याचीही परशुराम भक्तांची धारणा असते.