Ramdas Swami Jayanti 2025 Messages in Marathi: श्री रामदास स्वामींचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या तीर्थक्षेत्री झाला. समर्थ रामदास स्वामींचे मूळ नाव ‘नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी’ (ठोसर) असे होते. समर्थ रामदास यांनी दासबोध नावाचा प्रसिद्ध मराठी ग्रंथ लिहिला. संत रामदास स्वामी हे संत तुकारामांच्या काळातील एक संत होते. सूर्यजी पंतांना गंगाधर स्वामी आणि नारायण (समर्थ रामदास) हे दोन पुत्र झाले.
समर्थ रामदासजींच्या मोठ्या भावाचे नाव गंगाधर होते. सगळे त्याला 'श्रेष्ठ' म्हणत. ते एक आध्यात्मिक संत होते. त्यांनी 'सुगमोपाय' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. संत तुकारामांच्या सहवासामध्ये राहिले. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते. माघ वद्य नवमीला रामदास स्वामी यांनी समाधी घेतली. म्हणून या तिथीला रामदास नवमी असे संबोधले जाते. यावर्षी राम नवमी 6 एप्रिल रोजी साजरी होणार असून या दिवशी रामदास जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे रामदास स्वामी जयंतीनिमित्त WhatsApp Status, Quotes, Wishes द्वारे तुम्ही आपल्या मित्र परिवारास शुभेच्छा देऊ शकता.
सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जो करील तयांचे,
परंतु तेथे भगवंताचे
अधिष्ठान पाहिजे…
श्री रामदास स्वामी जयंतीच्या शुभेच्छा

जितुके काही आपणासी ठावे
तितुके हळूहळू शिकवावे
शहाणे करूनी सोडावे बहुत जन…
श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥
श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥
श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥
श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर समर्थ रामदास तीर्थयात्रेला निघाले. त्यांनी 12 वर्षे भारतभर प्रवास केला. ते भटकंती करत हिमालयात पोहोचले. हिमालयातील पवित्र वातावरण पाहिल्यानंतर, रामदासजींच्या मनात त्यागाची भावना जागृत झाली. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर हे शरीर धारण करण्याची काय गरज आहे? असा विचार त्याच्या मनात आला. त्यांनी 1000 फूट उंचीवरून मंदाकिनी नदीत उडी मारली. पण त्याच वेळी भगवान रामाने त्याला वाचवले आणि धार्मिक कृत्ये करण्याची आज्ञा दिली. त्यानंतर रामदास स्वामींनी आपले शरीर धर्मासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला.