Mahatma Phule (फोटो सौजन्य - Edited Image)

Mahatma Phule Jayanti 2025 Quotes In Marathi: महात्मा ज्योतिबा फुले असे समाजसेवक होते ज्यांनी लोकांसाठी स्वत: खूप वेदना भोगल्या. लोकांनी त्यांच्यावर शेण-चिखल फेकला मात्र ते मागे हटले नाहीत. त्यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले (Mahatma Phule) यांनी समाजासाठी केलेली कामगिरी ही कधीही न विसरता येण्याजोगी आहे. त्यांचे सुविचार, त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांची वागणूक या सर्वांचाच प्रभाव त्याकाळी समाजावर होता.

महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. दरवर्षी हा दिवस ज्योतिबा फुले जयंती (Mahatma Phule Jayanti 2025) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात जन्मलेले महात्मा ज्योतिबा फुले हे एक जातविरोधी समाजसुधारक होते ज्यांनी अस्पृश्यता निर्मूलन आणि समाज सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी शेतकरी आणि मजुरांच्या हक्कांसाठी संघटित प्रयत्न देखील केले. आजही त्यांच्या विचारांचा तरुण पिढीवर प्रभाव पाहायला मिळतो. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे काही प्रेरणादायी विचार जाणून घेऊयात. (हेही वाचा - Ambedkar Jayanti Rangoli Designs: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घरासमोर, शाळेच्या प्रागंणात काढा या सोप्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video))

महात्मा फुले यांचे प्रेरणादायी विचार -

  • प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते
  • नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.
  • केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे
  • भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे
  • समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.
  • ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात – महात्मा ज्योतिबा फुले
  • जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.
  • विद्वेविना मती गेली,मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्वेने केले.
  • जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील
  • प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. ज्यांना कुठलेतरी उद्दिष्ट गाठायचे असते.

ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्री यांना अशा काळात शिकवले जेव्हा समाज इतका सक्षम नव्हता. सावित्रीबाई फुले नंतर देशातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका बनल्या. महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्राबाई फुले यांचे कार्य इतिहासात सुर्वण अक्षरांनी लिहिलं गेलं आहे. पुढील अनेक पिढ्यानं-पिढ्या ते तरुणांसाठी प्रेरणादीयी ठरेल.