Ambedkar Jayanti Rangoli Designs (फोटो सौजन्य - you Tube)

Ambedkar Jayanti Rangoli Designs: डॉ. भीमराव आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जाते. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री देखील होते. डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती (Ambedkar Jayanti 2025) दरवर्षी 14 एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते. या वर्षी संपूर्ण देश त्यांची 135 वी जयंती साजरी करणार आहे. डॉ भीमराव आंबेडकर ज्यांना बाबासाहेब म्हणूनही ओळखले जाते. ते एक प्रख्यात विद्वान, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते ज्यांनी आपले जीवन सामाजिक न्याय आणि समानतेसाठी समर्पित केले. त्यांची जयंती सामाजिक सौहार्द आणि एकतेसाठी एकत्र येण्याचा दिवस म्हणून साजरी केली जाते.

डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी तुम्ही खास रांगोळी काढून हा दिवस अधिक खास करू शकता. या दिवशी तुम्ही घरासमोर तसेच शाळेच्या प्रागंणात बाबासाहेबांची प्रतिकृती असलेली रांगोळी काढू शकता. यासाठी तुम्हाला खालील व्हिडिओज नक्की उपयोगात येतील.

आंबेडकर जयंती रांगोळी डिझाईन, व्हिडिओ - 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. याशिवाय, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर, ते भारतात परतले आणि त्यांनी कायद्याचा सराव सुरू केला. दलित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला आणि शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमध्ये समानता मिळवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.