![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/09/गणेशचतुर्थ्याः-शुभकामनाः-6-380x214.jpg)
Ganesh Chaturthi 2023 Messages In Sanskrit: हरतालिका तीजाच्या दिवशी विवाहित स्त्रिया निर्जल उपवास ठेवतात आणि भगवान शिव (Bhagwan Shiv) आणि माता पार्वती (Mata Parvati) यांची पूजा करतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येत. या दिवशी गणपती बाप्पा प्रत्येक घरात विराजमान होतात. महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजी साजरी केली जात आहे. 10 दिवसांचा गणेशोत्सव 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला संपेल. गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा लाडका पुत्र गणपती बाप्पा यांच्या मूर्तींचे भाविक मोठ्या थाटामाटात स्वागत करतात. यावेळी सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष ऐकू येत असून सर्वजण भक्तीरसात रंगून गेलेले दिसतात.
दरम्यान, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला, असे मानले जाते. या दिवशीनिमित्त गणेश भक्त एकमेकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खास संस्कृत मधील व्हॉट्सअॅप मेसेज, GIF ग्रीटिंग्स, कोट्स, एसएमएस शेअर करून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा -गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा संदेश, WhatsApp Messages, Greetings, Quotes द्वारा शेअर करत स्वागत करा गणपती बाप्पाचं!)
Ganesh Chaturthi 2023 Messages In Sanskrit
1-पार्वतीनन्दनं शम्भोरानन्दपरिवर्धनम् । भक्तानन्दकरं नित्यं मयूरेशं नमाम्यहम् ॥
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/09/गणेशचतुर्थ्याः-शुभकामनाः-1.jpg)
2- एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्ं। विध्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम्॥
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/09/गणेशचतुर्थ्याः-शुभकामनाः-2.jpg)
3- त्रिलोकेश गुणातीत गुणक्षोम नमो नमः।
त्रैलोक्यपालन विभो विश्वव्यापिन् नमो नमः॥
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/09/गणेशचतुर्थ्याः-शुभकामनाः-3.jpg)
4- विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धितायं। नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/09/गणेशचतुर्थ्याः-शुभकामनाः-4.jpg)
5- वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:। निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा ॥
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/09/गणेशचतुर्थ्याः-शुभकामनाः-5.jpg)
भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र भगवान गणेश यांच्या जन्माशी संबंधित कथेनुसार, एकदा स्नान करण्यापूर्वी माता पार्वतीने आपल्या शरीरातील घाणीपासून एक पुतळा बनवला आणि त्यात प्राण फुंकला. त्यानंतर तिने आपल्या मुलाला द्वारपाल म्हणून नियुक्त केले आणि आंघोळीला गेली. आईच्या आज्ञेचे पालन करून गणेशाने भगवान शिवाला आत जाण्यापासून रोखले त्यामुळे शिव क्रोधित झाला आणि त्याने गणेशाचे डोके कापले. आपल्या मुलाची अवस्था पाहून माता पार्वती संतप्त झाली आणि त्यांनी पुन्हा भगवान गणेशाला जीवंत करण्यास सांगितलं. त्यानंतर श्रीगणेशाच्या धडात हत्तीचे डोके जोडले गेले, म्हणून त्याला गजानन असेही म्हणतात.